ओबीसी आरक्षण प्रश्नी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे आंदोलन

ओबीसी आरक्षण प्रश्नी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे आंदोलन

उदगीर (एल.पी.उगीले) : ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण प्रकरणी ना. देवेंद्र फडणवीस खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी उदगीर विधानसभा युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात आंदोलन करून उपजिल्हाधिकारी उदगीर यांना निवेदन देण्यात आले.

यासंदर्भात लातूर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय निटुरे म्हणाले की, आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे.देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही.केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले.ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे.ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे.भाजपच्या या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध उदगीर युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला.

 यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.सिद्धेश्वरजी पाटील,लातूर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्री.विजय राजेश्वरजी निटूरे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री.मंजूरखा पठाण, तालुका बूथ समन्वयक विजयकुमार चवळे, शहर बूथ समन्वयक अहमद सरवर, नगरसेवक राजकुमार भालेराव, मेहबूब शेख,पाशा मिर्झा, दावणगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन धनाजीभाऊ मुळे, प्रा.गोविंद भालेराव, उदगीर विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अमोल घुमाडे, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास एकुर्केकर, उदगीर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस सद्दाम बागवान, आदर्श पिंपरे नागेश पटवारी, कुणाल बागबंदे इत्यादी कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

About The Author