नाना-नानी पार्क लातूर परिसरात महिलांनि केली बंद प्रवेश दरवाजाची महाआरती करत गांधीगिरी करून प्रशासनाचा निषेध…

नाना-नानी पार्क लातूर परिसरात महिलांनि केली बंद प्रवेश दरवाजाची महाआरती करत गांधीगिरी करून प्रशासनाचा निषेध...

लातूर (प्रतिनिधी) : दि.२६ रोजी नाना नानी पार्क येथे नागरिकांच्या वतीने प्रशासणाच्या मनमानी करभारा विरोधात महिलांनी बंद केलेल्या प्रवेश दरवाजास पुष्पहार वाहत महाआरती करून गांधीगिरी केली. लातूर शहारामध्ये मनपाच्या पाठीमागे नाना नानी पार्क बऱ्याच वर्षांपासून त्यांची निर्मिती करण्यात आली त्याचा पुरेपूर फायदा नागरिकांना झाला आणि त्याचा आनंद ही बालक घेऊ लावले लातूर शहरात एकमेव उद्यान असलेले ही उद्यान उदयास आली आणि त्या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या संख्येने येऊ लागले कांही काळानंतर त्या उद्यानाचे नाव मा. विलासराव दगडोजीराव देशमुख असे देण्यात आले. नावाने नागरिकांच्या सेवेसाठी व बालकांना मनोरंजना व्हावे या करिता साहेबांच्या संकल्पेतून उद्यान उभा करण्यात आले.या संकल्पनेतून आज्जी आजोबा यांना वृद्ध वया मध्ये आनंदाने कांही क्षण व मनमोकळे पणाने कांही वेळ या उद्यानात जावे तसेच बालकांना ही कसलेही अडचण न येता हे उद्यान चालू करण्यात आले होते .या उद्यानात बऱ्याच वर्षांपासून अनेक सांकृतिक कार्यक्रम व समाजिक कार्यक्रम होतात प्रत्येकाला हा उद्यान सोयीस्कर महत्वाचा वाटतो अनेक वर्षांपासून सकाळी व संध्याकाळी जेष्ठ नागरिक व महिला तसेच बालक ही मनोरंजना साठी उद्यानात येतात आणि शरीर निरोगी आसवे या करिता फीरण्यासाठी महिला व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येतात असे असताना कांही महिन्यापासून तेथे खाजगी कंपनी ने मनमानी करत कांही फिरण्याचा भाग बंद केलेला आहे त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे दिसून आल्याने सर्व नागरिकांनी व महिलांनी स्वाक्षरी मोहीम राबवून नागरिकांना फिरण्यासाठी बंद केलेला परिसर खुले करावे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. त्यावर आयुक्तांनी मी प्रत्येक्ष येऊन पाहणी करून नागरिकांना येणारे अडचणी दूर करून नागरिकांना कसलेही त्रास होणार नाहीं आसे आश्वासन देण्यात आले होते परंतु त्या बाबत आयुक्तांनी व प्रशासनाने कसलेही पाऊल उचलवले दिसून आले नाही त्या उलट खाजगी कंपनीची मनमानी वाढू लागली आणि उर्वरित असलेले परिसर ही जाळी बांधून बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.ते पाहून नागरिक संभ्रमात पडल्याने सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन प्रशासनाने बंद केलेल्या प्रवेशद्वार ची महाआरती करून गांधीगिरी केली.आतातर प्रशासन उद्यान परिसरात भेट देऊन नागरिकांना विश्वासात घेऊन अडचण दूर करेल आणि बंद केलेला परिसर खुला करेल. तरी या बाबत पालकमंत्री मोहदय यांनी ही दक्षतेने लक्ष घालून नागरिकांना येणारे अडचण व मा. विलासराव देशमुख पार्क विना अट सर्वासाठी खुले करावे अशी अपेक्षा नागरिक करित आहेत.

यावेळी मनसेचे शहर संघटक व सामाजिक कार्यकर्ते अँड.अजय कलशेट्टी,जेष्ठ नागरिक बंडाप्पा जवळे, अँड.श्रीशैल्य उडगे,महानंदा हमीने,माधुरी चौधरी,मीना चंदिले,जयाबाई त्रिमुखे,मंगला हलवाई, सुमन बागडे,अलकनंदा माने,सुभाष माशाळकर,रमेश मुळे, संतोष वडवले, हेमंत वडणे,अँड.शिवकुमार बनसोडे,अँड.शिरीष धहीवाल,श्रीराम कोळेकर, शिरीष माळी, लिंबाळप्पा दाणे, गजानन हुंडेकरी,अशोक पंचाक्षरी,हुशेन पठाण,मोतीराम कदम,पारस चापसी,शिवा धुळे,मन्मथप्पा पोपडे,सुधीर आडगावकर, आनंद जवळे,शिवा रोडे,अजय कामदार,आदी व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!