नवीन बोर व पाईपलाईन दुरुस्ती बाबत प्रभाग क्र.3 अध्यक्ष विकास कांबळे यांचे मनपायुक्तांना निवेदन
लातूर (प्रतिनिधी) : तीव्र उन्हाळ्याची पाणीटंचाई लक्षात घेता लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रभाग क्र 3 येथे नवीन बोर पाईपलाईन दुरुस्त करण्यात यावी याबाबतचे निवेदन आज मनपा आयुक्त यांना देण्यात आले. यामध्ये संत गोरोबा सोसायटीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाजूस असलेल्या बोरच्या पाईपलाईनचे पाईप उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. त्याचबरोबर उदारे यांच्या घरापर्यंत तसेच साधू मगर यांच्या घरापासून ते श्याम संपते यांच्या घरापर्यंत उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता नवीन पाईप लाईन करणे आवश्यक असून पाण्याचा अपव्य टाळत नागरिकांच्या सोयीसाठी पाईपलाईनची सोय करण्यात यावी अशी मागणी प्रभाग क्र.3 चे अध्यक्ष विकास कांबळे यांनी मनपा आयुक्त या निवेदनाद्वारे केली आहे. विकास कांबळे, देविदास गायकवाड, नवी नळेगावकर, गोपाळ मगर, प्रकाश पाटोळे ,महेश हनमंते, संतोष शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.