हत्तीबेटाच्या विकास कामांना ३ कोटीची प्रशासकीय मान्यता

0
हत्तीबेटाच्या विकास कामांना ३ कोटीची प्रशासकीय मान्यता

हत्तीबेटाच्या विकास कामांना ३ कोटीची प्रशासकीय मान्यता

उदगीर (एल.पी.उगीले) : माळरानावरचा स्वर्ग म्हणजे उदगीर तालुक्यातील हत्तीबेट परिसर असून या भागात १२ वर्षानंतर कामाला सुरुवात झाली आहे. मागील काळात कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करुन हत्तीबेटावरील विविध विकास कामे करण्यात आली. पुढील काळात हत्तीबेटाचा विकास करण्याचा ध्यास घेवुन वेरुळ, अंजिठा लेणीच्या धर्तीवर हत्तीबेटाचा विकास करणार असल्याचा शब्द क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिला होता. त्यामुळे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून ३ कोटी रुपयाच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता देवुन तात्काळ ४५ लक्ष रुपये वितरीत करण्यात आले आहेत. या निधीतून विविध विकास कामे करण्यात येणार आहेत.
हत्तीबेटावर अजूनही १० हेक्टर क्षेत्र शिल्लक असून यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागात पर्यटकांची गर्दी होईल व वेरुळ अजिंठाप्रमाणे आपले हत्तीबेट पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल अशी अपेक्षा ना.बनसोडे यांनी व्यक्त केली.
मागील काळात मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला. त्यात प्रामुख्याने कृषी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, रस्ते आदी क्षेत्रामध्ये भरीव काम केले. गेल्या तीन वर्षात ३ हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. मागील काळात राज्यमंत्री असताना आपल्या भागातील हत्तीबेटाला पर्यटन स्थळाचा ‘ब’ दर्जा मिळावा म्हणून जवळपास ४ ते ५ हजार पानांचा प्रस्ताव तयार पण त्याला मंजुरी नव्हती म्हणून आपण स्वत: वैयक्तीक लक्ष देवून हत्तीबेटाला पर्यटनाचा ‘ब’ दर्जा मिळवून दिला.
प्रभु श्रीरामाचे चरण स्पर्श झालेली ही भुमी आहे,म्हणून या भागाचा विकास करण्यासाठी ५ कोटी रुपयाचा निधी मागील काळात दिला होता. त्यात भर म्हणून आणखी ३ कोटीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे हत्तीबेटाचा विकास होणार असल्याची ग्वाही ना.संजय बनसोडे यांनी दिली आहे.
निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल देवर्जनसह पंचक्रोशीतील भाविक – भक्त व नागरिकांनी ना. संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *