देवणी तालुक्यातील संगायो, इंगायो योजनेच्या प्रकरणात तलाठी मंडळाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या व शिक्के तयार करणाऱ्या दलालावर कार्यवाई करणार – तहसीलदार गजानन शिंदे
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : तालुक्यातील काही दलालांनी संबंधित गावचे तलाठी व मंडळाधिकारी यांच्या बोगस सह्या व शिक्के तयार करून संगायो, इंगायो योजनेच्या जवळपास त्रेचाळीस बोगस फाईली दाखल करून शासनाची दिशाभूल केली आहे. हे प्रकरण संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्या लक्षात येऊनही आजपर्यंत संबंधित दलालावर कसल्याचं प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. संबंधित दलालावर कासव गतीने कार्यवाई होतांना दिसत आहे. तात्काळ कारवाईची मागणी होत असताना सुद्धा दलालावर कोणत्याही प्रकारची तात्काळ कारवाई होतांना दिसत नाही, संबंधित प्रकरणात का कारवाई झाली असे तहसीलदार यांना विचारले असता, योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
व संबंधित बोगस फाईल दाखल केलेल्या त्रेचाळीस लाभार्थ्यांच्या चौकशीसाठी नोटीस काढल्या आहेत. सदर फाईल कोणत्या दलाला मार्फत दाखल केली आहे. हे संबंधित लाभार्थ्याकडून दलालांचे नावे घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले.
सविस्तर माहिती अशी की, निराधार, निराश्रित लोकांना सन्मानाने जगता यावे, त्यांची उपासमार होऊ नये. म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार चाळीस साठ टक्क्यांचा फार्मूला वापरून संगायो, इंगायो, अपंग, परितक्त्या विधवा महिलांना आर्थिक साहाय्य करीत असते. त्या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी काही निकष घालून दिले आहेत. त्या निकषात बसत असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र या योजनेसाठी काही दलालांनी आपला धंदा करून घेतला आहे. काही लाभार्थी या कोणत्याही निकषात बसत नसतांना त्यांच्या नावे शेती व कुटुंबात दुसरी व्यक्ती कमावती असतांना तलाठी व मंडळाधिकारी यांच्याशी संगनमत करून त्यांच्या नावे बोगस एकवीस हजार रुपयेचे उत्पन्न काढून सदर लोकांकडून पाच हजार रुपये घेऊन या लाभार्थ्याना पात्र करून त्यांना लाभ मिळवून देण्याचा ठेका देवणी येथील दलालांनी घेतला आहे. या दलाला अभय नेमके कोणाचे? तलाठी व मंडळाधिकारी यांच्या सह्या व शिक्के तयार करण्याचे धाडस यांना कोठून आले? यांचा करता करविता नेमका कोण? यांची चौकशी करण्यात यावी, त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा विद्यमान कार्यरत असलेल्या तहसीलदार यांच्याही सह्या व बोगस शिक्के तयार करतील त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल, या बोगस दलालावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे, तहसीलदार गजानन शिंदे यानी आमच्या प्रतिनिधीना बोलताना सांगितले की, या दलालावर कार्यवाई करणारच आहोत.