विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती च्या अध्यक्षपदी गजानन सताळकर तर कार्याध्यक्षपदी अंजुम कादरी यांची बिनविरोध निवड

0
विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती च्या अध्यक्षपदी गजानन सताळकर तर कार्याध्यक्षपदी अंजुम कादरी यांची बिनविरोध निवड.

विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती च्या अध्यक्षपदी गजानन सताळकर तर कार्याध्यक्षपदी अंजुम कादरी यांची बिनविरोध निवड.

उदगीर (एल.पी.उगीले) : दिनांक 18 मार्च 2024 रोजी हुतात्मा स्मारक गार्डन येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या सार्वजनिक जयंती निमित्त नूतन कार्यकारणी निवडीची बैठक माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती गजानन सताळकर यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी उदगीरच्या इतिहासात प्रथमच अंजुम कादरी यांची कार्याध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीला लेडी पॅंथर मायाताई कांबळे, अजित शिंदे, नामदेव भोसले ,नरेंद्र उजेडकर, सुबोध एकुरकेकर, अर्जुन वाघमारे ,कपिल मादळे, राजू कांबळे दावणगावकर,आकाश कस्तुरे, राहुल कांबळे, आकाश माने ,बालाजी कारामुंगे ,प्रेम तोगरे, त्रिसरण उजेडकर, आदित्य मटके, कपिल शिंदे ,अजय सूर्यवंशी, आनंद कांबळे, सुशांत जाधव सौरभ कांबळे, मनोज जोगदंड, करण अंधारे ,संदेश चौधरी ,गौरव गंडले , मनोज गायकवाड, शुभम गायकवाड, निखिल कोरमुळे, अमर फारुक सय्यद ,अण्णासाहेब बनशेळकीकर,गौतम किवंडे, अभिनव गायकवाड ,धीरज वाघमारे , बबलू मसुरे ,शुभम गायकवाड, प्रेम गायकवाड ,अजय बलांडे , शुभम आचार्य , सुरेश कांबळे, संतोष जाधव ,बाळासाहेब हांदिखेरे, अभिजीत अंधारे, बबलू मसुरे, सुधीर बलांडे, काळू कांबळे, अमोल मसुरे, विश्वजीत गायकवाड ,बबन सुळकेकर, महेश गंडारे , सतीश वाघमारे, बालाजी कांबळे ,शिवमुर्ती उमरगेकर,सुरेंद्र वाघमारे, अक्षय सावंत इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका सामान्य कार्यकर्त्याला सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल गजानन सताळकर यांनी सर्व आंबेडकर प्रेमी जनतेचे आभार मानले, तर इतिहासात प्रथमच एका महिलेला कार्याध्यक्ष म्हणून संधी दिल्याबद्दल अंजुम कादरी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *