महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बेस्ट लायब्ररी युजर अवॉर्ड प्रदान
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बेस्ट लायब्ररी युजर अवॉर्ड ने महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले, हा पुरस्कार ज्या पाच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त पुस्तके वाचली असतील अशा पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष 23-24 साठी मडके साक्षी श्रीमंत (बीएससी तृतीय), बिराजदार स्नेहा संजयकुमार (बीएससी द्वितीय), करकरे शुभम विलास (बीएससी तृतीय), कुंडगिर आदिती भास्कर (बीएससी प्रथम)आणि गायकवाड हेमलता देवीदास (एम.ए.द्वितीय) या पाच विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, ग्रंथपाल प्रा.डॉ.एल.बी.पेन्सलवार आणि प्रा.डॉ.एम.बी.स्वामी यांच्या हस्ते देण्यात आला. या गुणवंत वाचक विद्यार्थ्यांचे म.ए.सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी आणि सर्व संस्था सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.जी.पाटील, ग्रंथपाल प्रा.डॉ.एल.बी.पेन्सलवार, ग्रंथालय समितीचे सदस्य आणि प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.