भाजपाने सर्व सामान्याच्या हितासाठी काम केले – अप्पाराव कुलकर्णी
लातूर (प्रतिनिधी) : कॉग्रेसने लोकशाहीचा खुन करून 25 जून 1975 साली देशात आणीबाणी लागू करून देशभर आत्याचार आणि दडपशाही सुरू केली. सत्तेचा व बळाचा वापर करून मानव अधिकाराचे व त्याच बरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे हानन केले. लाखो देश वाशियाना तुरूगांत डांबले या काळया कर्तूत्वाची तरून पिढीला माहिती व्हावी यासाठी भाजपा अद्यापही सक्रीय पणे काम करीत आहे. केंद्रातील भाजपा सरकारचे पूर्ण काम हे सर्वसामन्याच्या हितासाठीच आहे. आणि आजही ते कायम करीत आहेत असे प्रतिपादन लोकतंत्र सेनानी संघाचे जिल्हाध्यक्ष अप्पाराव कुलकर्णी यांनी केले.
यावेळी ते स्वामी विवेकानंद पॉलीटेक्नीक कॉलेज सभागृह एमआयडीसी कळंब रोड येथे भाजपा व भाजपायुमोच्या वतीने आणीबानीच्या लढयातील आंदोलाकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपिठावर भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, भाजपा युवामोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, अनिल आंधोरीकर, अॅड.गणेश गोमचाळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या ललीता जाधव, आदी मान्यवरांची उपस्थीती होती.
यावेळी पुढे बोलताना अप्पाराव कुलकर्णी म्हणाले की कॉग्रेस सरकारणे लोकशाहीचा खुन करून सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आणीबाणी लागू केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे देश चालतो परंतू कॉग्रेसने सर्वसामान्याचा गळा घोटण्याचे काम केलेले आहे. या काळया दिवसाची माहिती तरूणाईला व्हावी या दृष्टीकोणातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सध्याच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारणे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले व या माध्यमातून सर्वसामान्याना दिलासा देण्याचे काम केले असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले. प्रारंभी आणिबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्या लातूरातील स्वातंत्र्य सैनिक अप्पाराव कुलकर्णी, सुधाकर पांगळ, अशोकराव मठपती, शिवरूद्र धाराशिवे, ज्ञानेश्वर रसाळ, वसंतराव कुलकर्णी, विजयकुमार धाराशिवे, चंद्रकांत मलवाडे, गोविंद ममदापूरे, निवृत्ती मलवाडे, नारायण मिंड, आनिल आंधोरीकर, निवृत्ती करडे, व्यंकटराव कोंडगीरे, सोपान मंडाले, सिद्राम ईळेकर, वाघन म्हेत्रे, आरूण देशपांडे, शशीधर प्रयाग, दिलीप भातलवंडे, प्रकाश जोशी, पंडीत तळेकर, तुळशिराम सपाटे, आदी लोकतंत्र सेनानीचा सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक भाजपा युवा नेते तथा नगर सेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अब्दुल गालीब शेख व रवि लवटे यांनी केले तर आभार व्यंकटेश हांगरगे यांनी मांडले. यावेळी लोकतंत्र सेनानी, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्त्याची मोठया संख्येने उपस्थीती होती.
भाजपाचा विधायक संदेश तरूणाईत पोहोचविण्याचा निर्धार..
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपायुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आणिबाणीच्या विरोधात काम केलेल्या आंदोलकांचा व सत्यागृह केलेल्या व्यक्तीचा भारत मातेची प्रतिमा देउन सन्मान करण्यात आला ही परंपरा यापुढील कालावधीतही कायम राहणार असुन भाजपाचा हा विधायक संदेश तरूणाई पर्यंत पोहचविण्याचा निर्धार असल्याची प्रतिक्रिया भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी प्रास्ताविकात बोलताना व्यक्त केली.