जलसिंचनाचे कार्यक्षेत्र वाढवून शेतक-यांच्या जिवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार – प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : मतदार संघात जलसिंचनाचे कार्यक्षेत्र वाढवून शेतक-यांच्या जिवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असे मत जलसंपदामंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात मांडले.
येथील दिपवर्षा मंगल कार्यालयात आयोजित परिसंवाद यात्रेच्या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, बस्वराज पाटील नागराळकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनिल गव्हाणे, सुनिल चव्हाण, आशा भिसे, यशपाल भिंगे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
पुढे बोलताना जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले आमदार बाबासाहेब पाटील यांनी मन्याड नदीवरील कोल्हापुरी बांधाऱ्याचे रूपांतर बॅरेजेस मध्ये करावे या मागणीसाठी मागील काळात मागणी करून पाठपुरावा केला.या मागणीच्या अनुषंगाने मन्याड नदीवरील बॅरेजेस
उभारणीचे काम लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगून या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बांधणीचे काम मजबूत असल्याने विधान सभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून येणाऱ्या काळात अशाच प्रकारे काम करून कार्यकर्त्यांनी निवडणूकीस सामोरे जाऊन यश प्राप्त करावे.
मतदार संघातील साठवण तलावातील गळती थांबवणे, तलावात अधिकाधिक पाणी साठा या कामासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा अशी मागणी यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी जलसंपदा मंत्री पाटील यांच्याकडे केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषदेचे गट नेते मंचकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजी काळे, करीम गुळवे, अजहर बागवान, शिवाजी खांडेकर, गणेश फुलारी, प्रशांत भोसले, राजाभाऊ शिंदे, डी.के.जाधव, दयानंद पाटील, नगरसेवक अभय मिरकले, आशिष तोगरे, डाॅ.फुजैल जहागीरदार, पाणी पुरवठा सभापती अनुराधा नळेगावकर, सय्यद लाल सय्यद सरवर, नगरसेविका महानंदा डावरे,नगर तानाजी राजे, हुसेन मणीयार, फेरोज शेख,अनिस कुरेशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.माने यांनी केले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे यांनी आभार मानले.