पदोन्नती आरक्षण संदर्भात ०७ मे २०२१ रोजीचा असंविधानिक शासन निर्णय रद्द करा
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हाधिकारी कार्यलय येथे पदोन्नती आरक्षण संदर्भात ०७ मे २०२१ रोजीचा असंविधानिक शासन निर्णय रद्द करून पदोन्नती मधील आरक्षण व अन्य मागण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना व आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी आक्रोश आंदोलन करण्यात आले.
देशातील कामगार हिताचे 44 कायदे रद्द करून 4 नवीन कायदयानुसार कामगार व कामगार संघटना विरोधी केलेले बदल रद्द करावे.परदेशी शिष्यवृत्ती करिता उत्पन्नाची अट अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता घटनाबाह्य असल्याने उत्पन्नाची अट रद्द करावी या प्रमुख मागण्यासह एकूण 16 मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनावर सत्यप्रकाश कांबळे, सिद्धार्थ कुसभागे, बालाजी कांबळे, डी के गवळी,संजय गायकवाड, बी आर ढगे,एम बी वाघमारे, बाबासाहेब साबळे,विशाल गायकवाड, समाधान कोळी,संजय सगर,एस के कांबळे, बी एन लोकरे,डी बी कांबळे, व्ही एन आल्टे,अजय गायकवाड, राजाराम साबळे, बाबासाहेब कांबळे, आनंद डोणेराव, एस व्ही भोसले, आर टी साबळे व नागसेन कांंबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आरक्षण कृती समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी व अनेक सभासद उपस्थित होते.