प्रा. डॉ दीपक चिद्दरवार यांनाछत्रपती शाहूमहाराज पुरस्कार जाहीर
उदगीर (प्रतिनिधी) : इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व सामाजिक न्याय दिनानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार प्रा .डॉ . दीपक चिद्दरवार यांना जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
प्रा.डॉ. दीपक चिद्दरवार हे उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.त्यांचे विविध लेख व पुस्तके प्रसिद्ध असून त्यांना देखील सन्मान मिळाला आहे.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट रासेयो कार्यक्रमाधिकारी म्हणून गौरव केला आहे.आव्होपा या सामाजिक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील कार्याचा मानदंड त्यांनी उभा केला आहे. AVOPA च्या माध्यमातून कार्याची नोंद घेऊन त्यांना सामाजिक क्षेत्रातून यावर्षीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मराठवाड्यातून ते एकमेव या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर,सचिव प्रा.मनोहर पटवारी,प्राचार्य डॉ .आर.आर.तांबोळी(प्रभारी प्राचार्य) प्रा,डॉ .राजकुमार मस्के(उपप्राचार्य ), AVOPAचे अध्यक्ष प्रा. संजय चन्नावार, सचिव विजयकुमार गबाळे, कोषाध्यक्ष बालाजी बुन्नावार व सर्व सभासद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.