ग्रामपंचायत कार्यालय सुनेगाव(शेंद्री)शेनी यांच्या वतीने गावात ११९ नागरीकांचे कोरोना लसीकरण

ग्रामपंचायत कार्यालय सुनेगाव(शेंद्री)शेनी यांच्या वतीने गावात ११९ नागरीकांचे कोरोना लसीकरण

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रूध्दा यांच्या मार्फत ग्रामपंचायत कार्यालय सुनेगाव( शेंद्री)शेनी यांच्या वतीने कोरोना विषाणूचा तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील 18 ते 65 वर्ष वयोगटाच्या सर्व नागरीकांचे लसीकरण करून घेण्यात आले. यावेळी गावात लसीकरणाला उत्तम प्रतिसात मिळाला असून 18 ते 65 वर्ष वयोगटावरील 119 नागरीकांचे लसीकरण करून घेण्यात आले.

सदरील कामी ग्रामपंचायत ने मोठ्या प्रमाणात गावात स्पिकरद्वारे जनजागृती करून लोकांना कोरोना लसीचे महत्व पटवून दिले. काही महीन्यापूर्वी गावात अनेक कोरोना पेशंट होते पण सध्या गावात एकही कोरोना रूग्ण नसुन आता संपूर्ण गाव कोरोना मुक्त झाले आहे. खबरदारी म्हणून एक पुढचे पाऊल टाकत ग्रामपंचायत ने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याला ग्रामस्थांनी भरघोस प्रतिसाद दिला.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी प्रा.आरोग्य केंद्र अंधोरी डॉ. बाळासाहेब बयास यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन व नारळ फोडून लसीकरणाला सुरवात करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाकडून वैद्यकिय अधिकारी डॉ. बाळासाहेब बयास, समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र रूध्दा डॉ. सुभाष नाईक, ए.पि.डब्लु सोनटक्के बालाजी, ए.एन.एम नंदा पोपलाईत, गट प्रर्वतक आयोध्या जायभाये, आशा सेविका स्वाती जायभाये, वाहन चालक भिमराव गायकवाड, सहशिक्षक दिपक हिंगणे आदींचा शाल ,श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच उषा गोपीनाथ जायभाये, समाज सेवक राम जायभाये, माजी सरपंच सोपान जायभाये , शिवदास थगनर, सहशिक्षक शिंदे, धोंडीराम जायभाये, माधव काटे पत्रकार गोविंद काळे आदीसह गावातील नागरीकांची उपस्थिती होती

About The Author