नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांचा सत्कार व शिवसैनिकांचा मेळावा संपन्न

नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांचा सत्कार व शिवसैनिकांचा मेळावा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सर्व शिवसैनिक यांची बैठक व नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांचा सत्कार तालुका शिवसेना यांच्या वतीने येथील शिवनेरी संपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी  रेड्डी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्रात अहमदपूर शिक्षण पॅटर्न राज्यभर गाजला आहे. त्याचं पद्धतीने येणाऱ्या काळात शिवसेनेचा अहमदपूर पॅटर्न राज्यभर गाजला जाईल यासाठी मेहनत घेऊन सर्व शिवसैनिक यांनी कामाला लागावे असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे. या बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख  विलास पवार हंगरगेर, विधानसभा संघटक तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य विलास पवार शहर प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत  सांगवीकर नगरसेवक संदीप चौधरी, उपतालुका प्रमुख अनिल लामतुरे,गणेश पांचाळ, लहू बारवाड, प्रमोद गोरटे, तिरुपती पाटील, विभाग प्रमुख हाडोळती तथा ग्राम पंचायत सदस्य दत्ता हेंगने,विभाग प्रमुख गणेश माने, लक्षण महाराज अलगुले, सरपंच राम माळी, युवा सेना तालुका प्रमुख रामप्रसाद अय्या, बाजार समितीचे संचालक माऊली देवकाते, संजय बुरुसापटे कार्यालय प्रमुख सुभाष गुंदिळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!