देवकरा येथे प्रबोधनातून मतदार जनजागृती
किनगाव (गोविंद काळे) : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक होय.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लातूर जिल्हात 7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून देवकरा येथे सेवानिवृत्त कलाध्यापक नागनाथ स्वामी यांनी उपस्थितीत मतदार बांधवांना प्रबोधन केले. सदरील कार्यक्रम जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथक जनजागृती करत आहे.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे यांच्यासह देवकराचे तलाठी सौदागर वैदय,ग्रामसेवक अनंत पाटील,कोतवाल बालाजी दहिफळे,गावातील दिपक फड,कल्याणराव बदणे,प्रल्हाद फड,वंदनाताई बदणे यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक नागनाथ स्वामी तर उपस्थितीतांचे आभार पुरुषोत्तम काळे यांनी मानले.