मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाला थांबवावे
लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मातंग समाजावर च्या अन्यायाला थांबवावे व आरोपीवर कठोर कारवाई करून कोटंबे व लामतुरे प्रकरणामधील आरोपींना अटक करावी असे निवेदन समस्त मातंग समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार माननीय श्री अमित विलासरावजी देशमुख साहेबांना आज देण्यात आले.
यावेळी आदरणीय श्री अमित विलासरावजी देशमुख साहेबांनी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना कॉल करून यासंदर्भात आरोपीवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावे अशा सूचना दिल्या. व दलित समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात विचारणा करून लातूर जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी अशा सूचना दिल्या.
यावेळी विकास कांबळे,शिवाजी जवळगेकर ,आनंद वैरागी, अंगद वाघमारे,नारायण कांबळे,राहुल क्षीरसागर,देविदास गायकवाड, भगवान कांबळे,पिंटू खैरमोडे ,नागनाथ डोंगरे, आदी उपसस्थित होते.