वैजनाथप्पा हामणे यांचे दुःखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधि) : येथील वीरशैव लिंगायत समाजातील जेष्ठ कार्यकर्ते वैजनाथ बापूरावप्पा हामणे यांचे दि.10 रोज बुधवारी सकाळी 9 च्या दरम्यान वयाच्या 98 व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .
त्यांचा वर दि.10.04.24 रोजी सांयकाळी सहा वाजता वीरशैव लिंगायत स्मशानभूमीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत हामणे आणि सेवानिवृत्त प्रा. राजकुमार हामणे यांचे ते वडील होत.
त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.