देवणी खुर्द येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : तालुक्यातील देवणी खुर्द येथे बौद्ध समाज मंदिर समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वऱ्हाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समाज भूषण पुरस्कार प्राप्त तुकाराम भद्राची देवणीकर यांचा सन्मान ग्रामपंचायतच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.मनोहर पाटील, रमेश कांबळे, अनिल कांबळे,संजय गरड, बापूराव उगिले, सरपंच यशवंत कांबळे, उपसरपंच विठ्ठल शिंगडे, व्हाईस चेअरमन माधव पाटे, ग्रामपंचायत सदस्य माधव रणदिवे, ग्राम रोजगार सेवक प्रभू काकनाळे, प्रशांत कांबळे, विजयकुमार सूर्यवंशी, माजी सरपंच चंद्रकला कांबळे,अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौसाबाई सारगे, आयोध्या सूर्यवंशी, सूर्यकांत कांबळे, दीपक रणदिवे, झेटींग रणदिवे,किरण कांबळे, वसंत रणदिवे, बाळू कांबळे, अजय देवणीकर,सिद्धार्थ कांबळे, व्यंकट कांबळे, मधुकर कांबळे यांच्यासह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायत च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच यशवंत कांबळे, उपसरपंच विठ्ठल शिंगडे व सदस्य यांच्यासह सर्वांनी अभिवादन केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक कांत कांबळे, शिक्षक व शालेय समितीचे अध्यक्ष, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.