सुट्ट्यात वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून दिल्या शुभेच्छा
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभ भाई पटेल सेमी इंग्रजी विभागात उन्हाळी सुट्टीतील विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे वाढदिवस विद्यालयात उत्साहात साजरे करण्यात आले. वाढदिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण दिवस असतो. प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी वर्षभर प्रत्येक विद्यार्थ्यांचे वाढदिवस विद्यालयात साजरे झाले, मग उन्हाळी सुट्टीतील प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलाही वाढदिवस विद्यालयात साजरा व्हावा, अशी इच्छा असते. आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विद्यालयात विद्यार्थ्यांचा,शिक्षकांचा वाढदिवस साजरा करून विद्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम उन्हाळी सुट्टीतील इयत्ता पहिली ते सातवी कक्षेतील वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस परिधान करून येण्यास सांगितले. नवे कपडे परिधान करणे केवळ हौस नाही तर त्यामुळे पुढच्या आयुष्याकडे नव्याने बघण्याची ऊर्जा विद्यार्थ्यांना मिळते. असा त्यामागचा उद्देश आहे. ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे अश्या सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर ड्रेस परिधान करून उत्साहात विद्यार्थी शाळेत आले होते. त्यामध्ये श्रीनिधी मोरखंडे,श्रेयस बलांडे, जानवी करकाळे, ओवी जाधव, गार्गी बुबने, संकल्प निडवदे, रुद्र होनराव, समीक्षा मामुलवार, आदिराज थोटे, उदय पाटील, सुधांशु नेमट,परी पाटील, माहेश्वरी मुळे, प्रथमेश शेटकर, श्रेया बिरादार, दीक्षा बिरादार, तनिष्का पाटील, स्वराली बोबडे, अद्वैत पाटील, श्रेया बिरादार, अदनान पठाण या सर्व विद्यार्थ्यांचे वाढदिवस उन्हाळी सुट्टी असून देखील त्यांचा वाढदिवस विद्यालयाच्या वतीने उत्साहात साजरा केला.विद्यार्थ्यांच्या डोक्यावर क्राऊन घालून त्यांना पुष्पगुच्छ देऊन, त्यांच्या आवडीचे गोड पदार्थ खाऊ घालून विद्यालयात उत्साहात वाढदिवस साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यासोबतचं सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौ.आशा बेंजरगे ,प्रतिभा विश्वनाथे, विजया होनराव, सुजाता महाजन या शिक्षकांचे वाढदिवस विद्यालयात जल्लोषात साजरे करण्यात आले.उन्हाळी सुट्ट्यात वाढदिवस असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक वर्षातील शेवटच्या दिवशी डबा पार्टीचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेल्या विविध पदार्थाचे स्वाद घेत विद्यार्थ्यांनी आनंदात डब्बा पार्टी केली.