सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची जयंती उत्साहात साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सेमी सरदार विभागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या विभाग प्रमुख सौं.आशा बेंजरगे, प्रमुख पाहुणे संदीप पाटील मंचावर उपस्थित होते. विभाग प्रमुख सौ आशा बेंजरगे, संदीप पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आहे. भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याची माहिती व्यक्त करताना संदीप पाटील म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विश्वाला मिळालेली देणगी होय. इथल्या जाती व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेवून हजारो वर्षापासून निर्माण झालेल्या भेदभावाच्या दऱ्या बुजवत समतेच्या विचाराचा वटवृक्ष निर्माण करणारा महामानव म्हणजेच बुद्धी सम्राट डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा त्यांचा मूलमंत्र समाज व्यवस्थेला एक करण्यासाठी महत्त्वाचा होता, अशा समर्पक शब्दात त्यांनी सखोल माहिती सांगितली. अध्यक्षीय समारोपात सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौ आशा बेंजरगे मार्गदर्शनपर बोलताना म्हणाल्या, आज आपण या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अनमोल आहे. ते शब्दात मांडणं शक्य नाही. बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आपल्याला बोलण्याचे, लिहिण्याचे वाचनाचे प्रबोधन करण्याचे, धर्मचिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य मिळालं आहे. बाबासाहेबांनी समतेचा रथ इथपर्यंत ओढत आणला आहे. तो वारसा आपण पुढे नेऊ.असे अनमोल मार्गदर्शन केले.त्यावेळी विद्यालयातील शिक्षक रविकुमार रोडगे, सुजाता महाजन, प्रतिभा वीरकपाळे, नीता गडीकर, जयश्री स्वामी, विजया होनराव, प्रतिभा विश्वनाथे, मंगल वाडकर, वृषाली जाधव, पल्लवी नीडवदे,भाग्यश्री शिरोळे,मीरा पाटील, अर्चना सोलापुरे, सुरेखा लाटे इत्यादी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.