सिद्धी शुगर येथे अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सिद्धी शुगर येथे अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

अहमदपुर (गोविंद काळे) : राज्य ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा सिद्धी शुगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त २८ जुन रोजी कारखाना परीसरात कारखान्याचे आधारस्तंभ, माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या केलेल्या वृक्षारोपणामध्ये मिलीया डूबिया, पिंपळ, वड, करंज, पिपरी, कडू लिंब आदी २०० रोपांची लागवड करण्यात आली. कारखाना परिसरात आतापर्यंत विविध प्रकारच्या ११,२५० वृक्षांची लागवड करण्यात आली असुन त्यामुळे कारखाना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हिरवळ पसरली आहे, त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मोलाची मदत झालेली आहे. आणखीही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे.

यावेळी कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. होनराव, जनरल मॅनेजर (टेक्नीकल) कम फॅक्टरी मॅनेजर बी.के. कावलगुडेकर साहेब, जनरल मॅनेजर (प्रोसेस) सी.व्ही.कुलकर्णी , जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) एस.बी.शिंदे, जनरल मॅनेजर (केन) पी.एल मिटकर, ऊस पुरवठा अधिकारी भाकरे, ऊस पुरवठा अधिकारी (सहाय्यक) व्ही.के. येदले, इनव्हॉरलमेंटल ऑफिसर दिलीप ताटे, दुध संकलन अधिकारी संदीप पाटील, केन यार्ड सुपरवायझर शेषेराव शिवणकर, गार्डन सुपरवायझर हरी पांचाळ, अँग्री सुपरवायझर बळी पाटील, टी.बी वाघमारे, सातपुते आदी उपस्थित होते.

About The Author