उदगीर भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची नियुक्ती

उदगीर भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची नियुक्ती

 उदगीर ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची नियुक्ती करण्यात आली असून शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांनी नियुक्ती पत्र दिले. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी बाळासाहेब पाटोदे यांना  नियुक्ती साठी शुभेच्छा दिल्या. युवकांचे संघटन चांगल्या प्रकारे करून शहरात भारतीय जनता पक्ष मजबूत करावा व अधिक जोमाने काम करावे असे सांगितले. 

 जनता पार्टीचे संघटन मजबूत करावे व आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकाना ताकतीने सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे असे सांगितले. 

नगराध्यक्ष बसवराजआण्णा बागबंदे यांनी मागील 4.5 वर्ष पासून झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचण्यासाठी युवा मोर्च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले.

भाजपा उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांनी नियुक्तीच्या शुभेच्छा देत  उदगीर भारतीय जनता पार्टी आगामी काळात नगर परिषद निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागावे अशा शुभेच्छा दिल्या.

या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ  तिरुके, उपनगराध्यक्ष सुधीर भाऊ भोसले,जिल्हा सचिव साईनाथ चिमेगावे,वसंत शिरसे,पाणी पुरवठा सभापती मनोज पुदाले,नगरसेवक ऍड दत्ता पाटील,सभापती रामेश्वर पवार,शहर सरचिटणीस नागेश आश्टुरे,पप्पु गायकवाड, आनंद साबणे,आनंद बुंदे,युवा मोर्च्या तालुका अध्यक्ष अमोल निडवडे,जिल्हा उपाध्यक्ष सागर बिरादार,विशाल रंगवाळ,आनंद भोसले,विरलाल कांबळे हे उपस्थित होते.  सूत्रसंचलन जिल्हा सचिव गणेश गायकवाड यांनी केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!