मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीस दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने 1,98,508 रूपयांचे योगदान
लातूर (प्रतिनिधी) : आज संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे त्यातच डेल्टा या नवीन विषाणूचा भारतात आणि महाराष्ट्रातही संसर्ग वाढला आहे. नवीन विषाणू डेल्टाचा उपद्रव कमी व्हावा म्हणून टाळेबंदी घोषित केली आहे. आपण सर्व काटेकोरपणे ती पाळत आहोत. टाळेबंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी परिपत्र क्र. संकीर्ण-1120/प्र.क्र.75/16-अ दि. 18 मे 2020 अन्वये आवाहन केले. त्याला अनुसरून संचालक, डॉ. धनराज माने उच्च शिक्षण संचालनालय, पुणे., सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर, श्री. पाटील गणेश, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, उच्च शिक्षण नांदेड विभाग, नांदेड यांच्या अहवानास प्रतिसाद देऊन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, ललीतभाई शहा, रमेशकुमारजी राठी, सचिव श्री. रमेशजी बियाणी, यांच्या मार्गदर्शनाखाली माहे मे 2021 च्या वेतनातून शिक्षक कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसांचे तर प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाचे वेतन कपात करण्याबाबत सूचित केल्याप्रमाणे माहे मे 2021 च्या वेतनातून शिक्षक रु. 1,76,096/- व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे रू. 22,412/- असे एकूण वेतन रक्कम रू.1,98,508/- दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड यांनी खारिचा वाटा म्हणून दयानंद शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री निधीकडे वर्ग केले आहे.
दयानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या या संस्थेने सामाजिक ऋणानुबंध ही तितक्याच जबाबदारीने जपलेला दिसून येतो. कोव्हीड -19 मुळे शै. वर्ष 2019-20 मध्ये संपुर्णपणे ऑनलाईन टिचींग तसेच परीक्षाही ऑनलाईनपध्दतीने यशस्वीरित्या घेतल्या आहेत. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास व्हावा याकरिता दयानंद शिक्षण संस्था व दि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन योग, प्राणायाम व ध्यान शिबिर आयोजीत करण्यात आले. एकूणच समाजसेवेच्या क्षेत्रात दयानंद शिक्षण संस्थेने एक योग पॅटर्न निर्माण केला आहे. माहे मे मध्ये दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कला महाविद्यालयाने रू.1,98,508/- (अक्षरी रक्कम रु. एक लाख अठ्ठयान्व हजार पाचशे आठ फक्त) RTGS द्वारे मुख्यमंत्री निधीस वर्ग केले आहेत.