श्रीराम गोजमगुंडे यांना पाहून मी अभिनेता झालो – मकरंद अनासपुरे
पुणे ( केशव नवले ) : श्रीराम गोजमगुंडे या आश्टपैलू कलाकार पहिला की एक ऊर्जा मिळायची,त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण आभिनयच्या क्षेत्रात आलो, असे उद्गार आभिनेता मकरंद आनासपुरे यांनी काढले.ते नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न
दिमाखदार कार्यक्रमात बोलत होते.या वेळी अनेक दिग्गज कलाकारांची हजेरी लावली होती.
मराठवाड्यातील पहिले सिनेअभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांच्या स्मरणार्थ सह्याद्री प्रतिष्ठाण, पुणे यांच्या वतीने नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार पुणे येथे संपन्न झालेल्या अतिशय भव्य कार्यक्रमात खा. युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांना पुरस्कार वितरित करण्यात आला.
यावेळी बोलताना मकरंद अनासपुरे यांनी श्रीराम गोजमगुंडे यांच्या आठवनीना उजाळा दिला, गावाकडे असताना श्रीराम गोजमगुंडे यांचा “निखारे” हा पहिला चित्रपट पाहिला आणि अभिनेता व्हायचं हे मनाशी ठरवलं, त्यांच्या सहज अभिनयाने प्रभावित होवुनच मी घडलो , तब्बल तीन तपापूर्वी बीडमध्ये निखारे या चित्रपटाचे शुटींग चालू होते. या चित्रपटाचे हिरो होते श्रीरामजी गोजमगुंडे. त्यावेळी मी शाळा बुडवून शुटींगला जायचो. व मलाही या चित्रपटात काम करावे असे वाटायचे, ती इच्छा किंवा माझे परिश्रम या पुरस्कारामुळे तीन तपांनी पूर्ण झाले असे उदगार काढले.
सिनेअभिनेत्रि मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध वक्ते नितीन बानगुडे पाटील,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात मराठी मालिका माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते, सिनेअभिनेते जयवंत वाडकर, सिद्धेश्वर झाडबुके, निर्माते विवेक वाघ, शिवशाहीर बाळासाहेब काळजे यांनाही गौरवण्यात आले. याकार्यक्रमास आ. संजय केळकर, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीनअप्पा काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, विक्रम गोजमगुंडे, श्रमिक गोजमगुंडे, विक्रांत गोजमगुंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवराज संभाजी राजे यांनी महाराष्ट्रात आज सिनेसृष्टीला पुरक असे वातावरण असूनही मराठी कलाकारांना वाव मिळत नाही, रजनिकांत हा मराठी माणूस असून दक्षिण भारतात जाऊन मोठा झाला. आज ज्येष्ठ मराठी कलाकरांनाही भविष्यात मराठी चित्रपट व त्या कलाकरांची स्थिती बिकट दिसत आहे. त्यामुळे आपण प्रेक्षकांनी व मराठी जनतेनेच मराठी कलाकार जिवंत ठेवले पाहिजे. तरच श्रीराम गोजमगुंडे यांनी रोवलेली अभिनयाची मुहूर्तमेढ शिखरापर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त करीत श्रीराम गोजमगुंडे यांच्या कार्याचे कौतुक केले.
70 च्या दशकात लातूर सारख्या ठिकाणी राहून राजा शिवछत्रपती या चित्रपटात भूमिका बजावणारे श्रीराम गोजमगुंडे यांचा आम्हाला अभिमान आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्टाच्या रंगभूमीची सेवा बजावली, असे मनोगत व्यक्त केले. तसेच श्रमिक गोजमगुंडे यांच्या सह्याद्री प्रतिष्ठाण च्या दुर्ग किल्ले संवर्धनाच्या कार्याचेही कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन शैलेश गोजमगुंडे यांनी तर प्रास्ताविक अजय गोजमगुंडे यांनी केले.
कर्यक्रमास श्रीराम गोजमगुंडे यांचे सुपुत्र अविष्कार, कल्पक व पुतणे विशाल गोजमगुंडे, रवी सुडे तसेच लातूर, पुणे येथील रसिक तसेच गोजमगुंडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कर्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सह्याद्री प्रतिष्ठांचे गणेश खुटवड, गौरव शेवाळे, प्रवीण शिर्के यांनी परिश्रम घेतले.