संत ज्ञानेश्वर विद्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जगत ज्योती,विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शिवालिका हाके, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर,शिला जोगपेटे, संगीता आबंदे,सुजाता बुरगे, अयोध्या जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, विवेकानंद सुरनर, पद्माकर नळगिरे,उमेश फुलारी सह विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जगातल्या पहिल्या लोकसंसदेचे निर्माते, जातीभेद दूर करून मानवता हाच एक धर्म असा जगाला समतेचा संदेश देणारे समता नायक, विश्वगुरू महात्मा बसवन्ना यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी विद्यार्थ्यांची भाषणे झाली तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विषयी सचित्र माहिती लिहीली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार मीना तोवर यांनी मानले.