कोरोना काळात निर्बंधाचा अतिरेक नको – निवृत्ती सांगवे ( सोनकांबळे )

कोरोना काळात निर्बंधाचा अतिरेक नको - निवृत्ती सांगवे ( सोनकांबळे )

उदगीर (एल. पी. उगिले) : कोरोनाच्या नावाने सततचा लॉकडाऊन मुळे मध्यमवर्गीयांना जगणे कठीण होऊन बसले आहे. सतत व्यापार बंद असल्याने लघु उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी बँकांचे कर्ज काढून  उद्योग सुरू केले आहेत. तसेच उद्योगाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या ठिकाणी बाजार भावाने दुकाने भाड्याने घेतले आहेत. ते भाडे कसे द्यायचे? आणि उदरनिर्वाह कसा चालवायचा? अशा दुहेरी चक्रव्यूहामध्ये मध्यमवर्गीय सापडला आहे. त्यासाठी अतिकडक निर्बंध नकोत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे यांनी व्यक्त केली आहे.

 उपासमारीने मारण्याची वेळ आलेला मध्यमवर्गीय समाज घरी बसून खाणार काय? हा मोठा प्रश्न आहे. जे खुप गोरगरीब आहेत, त्यांना समाजातील श्रीमंत लोक आणि सरकारकडून देखील थोड्याफार प्रमाणात मदत मिळत आहे. मात्र मध्यमवर्गीयांची अवस्था अत्यंत बिकट आहे.” बाप भीक मागू देईना आणि आई जेवू घालीना” अशी अवघड अवस्था निर्माण झाली आहे. दुकानासाठी, उद्योगासाठी काढलेल्या कर्ज आता दुप्पट होऊ लागलली आहेत. त्याची चिंता एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला दैनंदिन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जे श्रीमंत किंवा नोकरदार लॉकडाऊनचे  निर्बंध खडक करा असे म्हणत आहेत, त्या मुठभर लोकांसाठी हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना पाय खोरून मारायला लावणार का? असा प्रश्नही निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी उपस्थित केला आहे.

 शेतकऱ्यांचे हजार प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. तशातच बाजारपेठा बंद झाल्याने कामगार  मजुरांचे आजचे काम गेले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जगण्याला आधार कोण देणार? कोरोना हा कायम असून आपण कोरोणा सोबत जगले पाहिजे,असे सुरूवातिला सांगितले गेले. मात्र सततच्या लाॅकडाऊन मुळे “रोग परवडला, उपचार नको “असे म्हणायची गरिबावर वेळ आली आहे. तसेच मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांनी दुकान उघडले, 2ते4 मिनिटे मागेपुढे झाले तर लगेच प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाऊ लागला आहे!साहेब व्यापारी हे चोर नाहीत किंवा गुन्हेगारी नाहीत.त्यांचे प्रश्न समजुन घ्या. त्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. दुकानाचे भाडे कुठून द्यायचे? बँकांचे कर्ज कुठून फेडायचे? आणि घरखर्च कसा चालवायचा? असे अनेक प्रश्न त्या लोकांसमोर आहेत.

 त्यामुळे त्यांच्यासोबत माणुसकीने व्यवहार करा.प्रत्येकवेळी बडगा उगारून प्रश्न मिटत नसतात.त्या मुळे व्यापारु,हातगाडीवाले,ठेलेवाले यांना थोडी सवलत द्या, अशी ही विनंती निवृत्तीराव सांगवे  (सोनकांबळे) यांनी प्रशासनाला केली आहे. प्रशासनाने अशीच कठोर भूमिका घेतली तर पोटाची आग बुजवण्यासाठी गोरगरीबांना नाइलाज म्हणुन रस्त्यावर उतरावे लागेल. असा इशाराही निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी दिला आहे.

About The Author