डॉ.दिलीप नागरगोजे यांच्या अकरावी तत्त्वज्ञान Question Bank चे प्रकाशन
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे लिखित अकरावी तत्त्वज्ञान Questions Bank चे प्रकाशन मंगळवार दि. 30 जून 2021 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तत्त्वज्ञानाची ही Questions Bank निकिता प्रकाशनाचे सर्वेसर्वा नरेंद्रजी गटागट यांनी प्रकाशित केली आहे.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी असे प्रतिपादन केले की, तत्त्वज्ञान विषयातील संकल्पनाची उकल होण्यास व चिकित्सक विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांपैकी सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा व नीतिमीमांसा यातील प्रमुख प्रश्नांची उकल या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होऊ शकेल असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले.
प्रकाशन समारंभाच्या व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ.सुनील साळुंके , डॉ. प्रदीप सुर्यवंशी, डॉ. दयानंद शिरूरे, डॉ. गोपाल बाहेती व महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते.