भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन तळेगावकर व मुख्यकार्यकारी अधिकारी कुलकर्णी भारतरत्न सहकारिता पुरस्काराने सन्मानित
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील तळेगावकर व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एल. एम. कुलकर्णी यांना मुंबई येथे सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला गेलेला भारतरत्न सहकारिता सन्मान-२०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बँकींग क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करणारी व दर्जेदार सेवा देणारी अग्रगण्य बँक म्हणून भाऊसाहेब सहकारी बँकेची ओळख आहे. बँकेने आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली असून २०२३-२४ मध्ये विशेष प्रगती केली आहे. बँकेस मार्च २०२४ अखेर १ कोटी १५ लक्ष रुपयांचा निव्वळ नफा व ०.४६ टक्के नेट एनपीए झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे आणि सहकार कायद्याची जाण ठेऊन बँकेने उत्तम व्यवस्थापन केले आहे. या कामी बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील तळेगावकर यांना अर्बन बँक सर्वोत्कृष्ट चेअरमन या श्रेणीतील प्रतिष्ठित भारतरत्न सहकारिता सन्मान हा संपूर्ण देशातील बँकेतून जाहीर झाला. हा पुरस्कार बँकेचे उत्कृष्ट व्यवस्थापन व उत्तम कामगिरीसाठी दिला जातो. बँकेचे चेअरमन यांना डिजीटल बँकिंगची आवड आहे, त्यामुळे त्यांनी बँकेत अनेक प्रकारे आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत कुलकर्णी यांना सुद्धा बँकेच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे कार्य व उत्कृष्ठ संचालन केल्याने सर्वोत्कृष्ट मुख्यकार्यकारी अधिकारी या श्रेणीतील प्रतिष्ठित भारतरत्न सहकारिता सन्मान जाहीर झाला. कुलकर्णी यांना बँकिंग क्षेत्रातील प्रचंड अनुभव व त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्यामुळे याचा बँकेस विषेश सहकार्य लाभले. बीटूबी इन्फोमेडिया व अँक्नोलेज पार्टनर नॅफकब नवीदिल्ली यांनी मुंबईतील हॉटेल ललित येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी भारत सरकारचे आयटी आणि कम्युनिकेशन मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुमनेश जोशी यांच्या हस्ते भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन तळेगावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.