बालाजी बिरादार यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार
अहमदपूर ( गोविंद काळे ) :
यशवंत विद्यालय अहमदपूर येथील मुख्याध्यापक बालाजी माणिकराव बिरादार यांनी टागोर शिक्षण समिती अहमदपूर या संस्थेत सन 1988 ते 30 जून 2021 असे 33 वर्ष सेवा पुर्ण केली. ते आज प्रदिर्घ सेवेतून सेवा निवृत्त झाले.आपल्या कार्यातून सर्वांचे प्रिय शिक्षक,पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक,ते प्राचार्य अशी पदे भूषवित अहमदपूर येथील यशवंत विद्यालय चे प्राचार्य म्हणून कार्य केले.यांचा 30 जून रोजी सेवापूर्ती सत्कार सोहळा सस्थेचे सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या हस्ते हा कार्यक्रम कोविड 19 चे सर्व नियम पाळून पार पडला. त्यांनी आपली सेवा सरस्वती विद्यालय कुमठा येथे 26 वर्ष सन 2014 पासून यशवंत विद्यालय अहमदपूर येथे बदली झाली.या ठिकाणी 3 वर्ष पर्यवेक्षक 3 महिने उपमुख्याध्यापक त्यानंतर 4वर्ष प्राचार्य पदावर भुषविले आहेत.
यशवंत परिवाराच्या वतीने विद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष टागोर शिक्षण समितीचे सचिव, शिक्षण महर्षी,दलित मित्र डी. बी. लोहारे गुरुजी पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद तात्या हेंगणे नगरसेवक रवी महाजन,विकास महाजन,काशिनाथ गाढवे,राजेश्वर पाटील,प्राचार्य डाँ दिलिप मुगळे यशवंत ज्यूनिअर काँलेजचे उप प्राचार्य गोडभरले,उपमुख्याध्यापक प्रेमचंद डांगे,पर्यवेक्षक रमाकांत कोंडलवाडे,उमाकांत नरडेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्राचार्य बालाजी बिरादार व सौ.शोभा बिरादार यांचा सपत्निक शाल,श्रीफळ पुष्पहार व श्री गणेश मुर्ती प्रतिमा भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी श्री व सौ बिरादार यांना पुढील निरोगी व सुखीआयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कपील बिरादार तर आभार शरद करकनाळे यांनी मानले.