सैनिकी विद्यालयात कै. मलशेट्टीआप्पा पाटील नागराळकर यांची पुण्यतिथी साजरी

सैनिकी विद्यालयात कै. मलशेट्टीआप्पा पाटील नागराळकर यांची पुण्यतिथी साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात उदगीर पंचक्रोशीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले कैलासवासी मलशेट्टीआप्पा वीरशेट्टीआप्पा पाटील नागराळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, संतोष चामले ( गणित) , बालाजी मुस्कावाड, बी टी पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी मुस्कावाड यांनी मलशेट्टीआप्पा पाटील नागराळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.उदगीर येथील पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा बहुमान आप्पांना मिळाला. त्यांची धारवाड येथील महातपस्वी कुमारस्वामी यांच्यावर श्रद्धा होती.

अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, आप्पांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली आहे. उदगीर पंचक्रोशीत अन्नदाते म्हणून त्यांना ओळखले जात होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी कांबळे यांनी केले तर आभार पंगू नागेश यांनी मानले.यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, प्रल्हाद येवरीकर, दिपक कांबळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author