श्यामार्य कन्या विद्यालय मध्ये डॉक्टर्स डे निमित्त कोरोना वारियर्स डॉक्टरांचे सत्कार 

श्यामार्य कन्या विद्यालय मध्ये डॉक्टर्स डे निमित्त कोरोना वारियर्स डॉक्टरांचे सत्कार 

उदगीर (प्रतिनिधी) : श्यामार्य कन्या विद्यालय मध्ये डॉक्टर्स डे निमित्त कोरोना वारियर्स डॉक्टरांचे सत्कार करण्यात आले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्ञाते टि के  होत्या. प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ती डॉक्टर प्रशांत कापसे तालुका आरोग्य  अधिकारी, डॉक्टर  दत्तात्रय पवार,  डॉक्टर शशिकांत देशपांडे, डॉक्टर स्मिता वंदे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर भाग्यश्री घाळे निमंत्रित  होते. सर्वप्रथम सर्व सत्कारमूर्ती पाहुण्यांची ओळख श्री निडवंचे एस एम यांनी करून दिली. श्यामार्य कन्या विद्यालय सर्व शिक्षक व मुख्याध्यापिका च्या वतीने कोरोना वॉरियर्स मोमेंटो, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व श्रीफळ  देऊन सत्कार  करण्यात आला. जागतिक महामारी मध्ये आज आम्हाला कोरोना वॉरियर्स देवदूत म्हणून  जरी ओळख असली तरी हा आमचा एक कर्तव्याचा भाग   आहे.  आज तिसरी कोरोना लाट आली तरी आम्ही सर्व त्याला थोपवण्यासाठी पुर्वतयारी करून ठेवली आहे.   covid-19 हा व्हायरस नवीन असल्याकारणाने प्रशासनासमोर अनेक समस्यांची प्रश्नचिन्ह  उभे होते.  सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स कोरोना वॉरियर्स च्या साह्याने covid-19 ला रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न  करत आहोत. सर्व समाजामध्ये व्हॅक्सिनेशन होने खूप जरुरीचे आहे. आपण सर्वजण लसीकरण करण्यासंबंधी समाजामध्ये प्रबोधन करुन आम्हा सर्वांची साथ द्यावी.  अशी भावना डॉक्टर पवार  यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

देवासारखी येती धावून, देवासारखे करतात काम, माणसातल्या देवाला सदैव आमचा सलाम अशी भावना श्रीमती ज्ञाते  यांनी यांनी व्यक्त केली. सर्व पाहुण्यांचे आभार मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एम. जे. कांबळे यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती वैशाली अनकल्ले  यांनी केले.

About The Author