सफाई कामगारांना न्याय द्या, मागणीसाठी बहुजन विकास अभियानचा अंध  सत्याग्रह

सफाई कामगारांना न्याय द्या, मागणीसाठी बहुजन विकास अभियानचा अंध  सत्याग्रह

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर नगरपालिकेतील सफाई कामगारांना न्याय दिला पाहिजे. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा नगर पालिकेच्या सफाई कामगारांनी शहरात उत्कृष्ट काम करून उदगीर नगरपालिकेला दरवर्षी स्वच्छतेचे पारितोषक मिळवून दिले आहे. तसेच कोरोना काळातदेखील या कामगारांनी जीवाची पर्वा न करता शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य टिकून राहावे. त्यांना कोणताही रोग  होऊ नये. साथीचे रोग पसरू नयेत. या दृष्टीने मोलाची कामगिरी केली आहे. अशा सफाई कामगारांना न्याय दिला पाहिजे. या मागणीसाठी उदगीर येथील सामाजिक संघटना बहुजन विकास अभियानच्या वतीने अंध सत्याग्रह करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

उदगीर नगर परिषदेचे सेवानिवृत्त सफाई कामगार यांच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्यांना त्वरित मिळावी. त्यांच्या डीए ची रक्कम पगारात सामील करून ती रक्कम त्वरित अदा करावी. अशा प्रमुख मागण्यासाठी व ज्या कामगारांनी आपले संपूर्ण जीवन उदगीर शहराला सुंदर करण्यासाठी सफाई करून घालविले. त्या लोकांवर आज या ना त्या कारणाने त्यांच्या हक्काच्या रकमेपासून त्यांना परावृत्त केले जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून असा आंधळा कारभार बंद व्हावा. यासाठी नगर परिषदेचे प्रशासन आंधळ्याची भूमिका घेत असून कर्मचाऱ्यांना न्याय देत नसल्यामुळे बहुजन विकास अभियानच्या वतीने डोळ्यावर काळ्यापट्या बांधून अंध सत्याग्रह केला.

यावेळी बहुजन विकास अभियान चे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार, लोकनेते बापूसाहेब कांबळे, बहुजन विकास अभियान चे सल्लागार ऍड. एम चव्हाण, मानसिंग पवार, संजय राठोड, राजहंस लोणीकर, लक्ष्मण आडे, बालाजी जकनाळकर, विजय आलुरे यांच्यासह असंख्य सेवानिवृत्त कामगारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.

About The Author