उदगीर शहरामधील सर्व वॉर्डामध्ये रोड व नाली तात्काळ करा – प्रहारची मागणी
उदगीर (प्रतिनिधी) : अमृत योजने अंतर्गत लिंबोटी धरणावरून उदगीर शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे शहरांतर्गत केली जाणारी पाईपलाईन साठी खोदकाम केले जात आहे. त्यासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत करण्यात आलेले शहरांतर्गत सिमेंट रस्ते फोडून पाणीपुरवठा पाईपलाईन टाकली जात आहे. हे काम गेल्या दोन अडीच वर्षापासून चालू आहे. त्यामुळे शहरांतर्गत रस्त्याची व नालीची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर हे रस्ते पूर्ववत दुरुस्त करणे अपेक्षित होते, पण हे खड्डे मातीने बुजवून तसेच सोडून देण्यात आले आहेत.त्यामुळे सर्व रस्त्यांची व नालीची दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांचा नागरिकांना गेल्या दोन वर्षापासून त्रास सहन करावा लागत असून नगरपालिकेने हे खड्डे तात्काळ बुजवून सिमेंट कॉंक्रिट वापरून ते दुरुस्त करण्यात घ्यावेत. आणि सर्व वार्डात रोड, नाली मंजूर असून अद्याप झालेले नाहीत.तर काही वार्डात मोजकेच रोड व नाली केले आहेत.काही वार्डात रोड नाली मंजूर असून करण्यात येत नाही .तरी उदगीर शहर हद्दीतील सर्व वार्डात रोड व नाली त्वरित करण्यात यावे. तर काही वार्डात रोड व नाली मंजूर नाहीत ते तात्काळ मंजूर करून देण्यात यावे. व उदगीरकरांना न्याय द्यावा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घेईल. याची नोंद घ्यावी. असे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर यांना देण्यात आले आहे. या वेळी विनोद तेलंगे जिल्हाउपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, तालुका उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, तालुका उपाध्यक्ष संदीप पवार, तालुका सचिव महादेव आपटे, सह-संपर्क प्रमुख सुनील केंद्रे, शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे, तालुका सरचिटणीस अविनाश शिंदे, तालुका उपाध्यक्ष संदीप पवार सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.