जागृती शुगर च्या २,५१,०११ साखर पोत्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पूजन संपन्न
देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रिज च्या २०२०-२१ च्या चालू गळीत हंगामात उत्पादीत केलेल्या २ लाख ५१ हजार ११ साखर पोत्या चे पूजन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा साखर कारखान्याचे संस्थापक दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन एस आर देशमुख, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, रेणा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अनंत देशमुख, संचालक संभाजी रेड्डी, कॉंग्रेस माध्यम जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील विजयनगरकर, जागृती शुगर चे प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख, जिल्हा बॅंकेचे सरव्यवस्थापक तानाजी जाधव, माजी सभापती गोविंद भोपणीकर, बालाजी बोबडे, सोनू डगवाले, सुपर्ण जगताप, सतीश पाटील, धनराज चिद्रे, भगवान सावंत, प्रभुराव जलकोटे, सुनील सावळे, शेख इब्राहिम, उदय मुंडकर, जागृती शुगर चे विविध खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जागृती शुगर परिसरात लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेव यांनी व उपस्थित अतिथी यांनी अभिवादन केले.