सोमनाथपूर येथे आरोग्य शिबीर संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : राज्य मंत्री संजय भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने व हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयत्ती निमित्ताने सोमनापुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग शहर उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय उदगीर, मधुर डायबेटिज सुपरस्पेशालिटी सेंटर उदगीर, निखिलेश्शर क्लिनिक उदगीर, सोनटक्के डेंटल क्लिनिक उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी,मधुमेह, रक्तदाब तपासणी व अल्पशा दरामध्ये मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व वृक्षारोपण करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनापुर सरपंच राम सुर्यवंशी, उदघाटक प. स.सदस्य सारजा पाटील, प्रमुख पाहुणे उपसरपंच संगीता राठोड ,आशा पवार, मीरा राठोड, संजय राठोड, वैजनाथ तोंडारे, जितेंद्र शिंदे, मारोती पवार, किशन चव्हाण, राजेश भाटे हे होते.कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रशांत नवटक्के, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक शहर अध्यक्ष अभिजीत औटे, राष्ट्रवादी महिला कॉग्रेस उदगीर शहर अध्यक्षा दिपाली औटे ,डॉ व्यंकटेश वट्टमवार ,डॉ संदिप सोनटंक्के, संस्कृतीक विभाग शहर उपाध्यक्ष रतिकांत घोगरे, ओमकार निरणे, शेख मोहम्मद, सरचिटणीस सय्यद सलीम, नारायण मानकोळे, बळवंत चिंचोलकर, युवती शहर अध्यक्षा ज्योती स्वामी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी 99 जणांची मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली तर 20 रुग्णांवर अल्पशा दरामध्ये उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ९९ लोकांमध्ये १२ नवीन मधुमेही रुग्ण आढळून आले. मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी केशव बिरादार, रामेश्वर फुलारी यांनी केली.