विकेंड लॉक डाऊनच्या धर्तीवर तालुक्यातील मेडिकल वगळता सर्व आस्थापणे शनिवार रविवार बंद -उप-जिल्हाधिकारी प्रमोद कुदळे

विकेंड लॉक डाऊनच्या धर्तीवर तालुक्यातील मेडिकल वगळता सर्व आस्थापणे शनिवार रविवार बंद -उप-जिल्हाधिकारी प्रमोद कुदळे

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील कोरोना संसर्ग जन्य रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर विकेंड लॉक डाऊनच्या धर्तीवर मेडिकल दुकाने वगळता सर्व आस्थापणे शनिवार,रविवार पुर्ण पणे कडक बंद राहतील असे उप-जिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांनी आज सायंकाळी तहसीलदार यांच्या दालनात तहसीलदार प्रसाद कुलकर्णी तसेच पोलीस निरिक्षक नानासाहेब लाकाळ यांच्यासह शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांना संबोधित करताना सांगीतले तसेच शहरातील सर्व आस्थापणाच्या व्यापाऱ्यांनी आप आपली आस्थापणे सोमवार ते शुक्रवार या रोजी ठरलेल्या वेळे प्रमाणे सकाळी ७ ते ४ या कालावधीत उघडी ठेवावीत काही व्यापारी ४ वाजल्या नंतर सुद्धा आस्थापणे बंद करताना दिसत नाही पोलीस स्टेशनची गाडी बाजारात आस्थापणे बंद करण्याचे आवाहन केल्यानंतरच आपली आस्थापणे बंद करत आहेत तरी सर्व व्यापाऱ्यांनी आपली आस्थापणे वेळेत बंद करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी यांच्या वतीने कारण्यात आले यावेळी कापड असोशियनचे जय भुतडा, गोदवार सावकार,फर्टिलायझर असोशियशनचे विनोद भुतडा, बजाज सचिन, किराणा असोशियशचे विलास भेटे, शिवप्रसाद प्रयाग,लेडिज एम्पोरिअम असोशियशनचे इमरोज पटवेकर, नवनाथ फुले, धोंडीराम गुंडरे, सतिष भदाडे, अमोल वंगलवार,आडत असोशियशनचे संतोष मेनकुदळे, ओम दराडे, भाजीपाला असोशियशनचे अझहर बागवान फळ विक्रेते असोशियशचे जावेद फकीरसाब बागवान, फेरीवाले विक्रेते असोशियशनचे वाजीद बागवान पत्रकार गोविंद काळे आदींची उपस्थिती होती.

About The Author