रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या शिबिरात ३५ जणांचे रक्तदान
लातूर (प्रतिनिधी) : डॉक्टर्स डे चे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन आणि रोटरी क्लब ऑफ लातूर होराईझन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले. भालचंद्र ब्लड बॅंक आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय या ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. भालचंद्र ब्लड बॅंक येथील रक्तदान शिबीराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा काळे यांच्या हस्ते तर महात्मा बसवेश्वर माहविद्यालयातील शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष सतिश कडेल,सचिव दिनेश सोनी, प्रोजेक्ट चेअरमन किशन कुलरिया, रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष प्रसाद वारद,सचिव सत्यजित धर्माधिकारी, प्रोजेक्ट चेअरमन श्रीनाथ चिद्रेवार, रोटरी क्लब ऑफ लातूर होराइझनचे अध्यक्ष डॉ.संजय गवई, सचिव निळकंठ स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ किरण दंडे, मोतीलाल वर्मा, ओमप्रकाश झुरूळे, विरेंद्र फुंडीपल्ले, श्रद्धानंद अपशेट्टी, जयेश पेद्दे, अमोल दाडगे, डॉ चंद्रप्रभू जंगमे यांच्यासह सर्व रोटरी व रोट्रॅक्ट सदस्यांनी परिश्रम घेतले.