विकास निधी कमी पडणार नाही….चंदन पाटील नागराळकर
निडेबन क्रांती नगर येथे पाईपलाईन कामाचे उद्घाटन
उदगीर ( एल.पी.उगीले ) : उदगीर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निडेबन ग्रामपंचायतीची झपाट्याने वाढ होत असून गावातील प्रत्येक वॉर्डातील लोकांना पाणी, रस्ते, पथदिवे यांचा त्रास होऊ नये म्हणून आमदार , खासदार, 15 वित्त आयोग अशा विविध लोकप्रतिनिधीं यांच्या फंडातून निधी खेचून आणून विविध योजने मधून विकास कामे कामे अवघ्या पाच महिन्याच्या आत काही मूलभूत सुविधेचे कामे पूर्ण तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. निडेबन गावाच्या प्रथम नागरिक सरपंच जयश्री बेल्लाळे व उपसरपंच आत्तार फय्याज (पप्पू भाई )यांच्यासह सर्व सन्माननीय सदस्य हे लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा करून लाखो रुपये निधी खेचून आणून निडेबन गावाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सरपंच, उपसरपंच ,सर्व सदस्य व कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी श्री बी. जी बिरादार या सर्वांच्या एकमताने विविध विकास कामे चालू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून क्रांतीनगर निडेबन येथे राष्ट्रवादी काँग्रेसची युवकांची बुलंद तोफ चंदन पाटील नागराळकर यांच्या शुभहस्ते 15 व्या वित्त आयोगातून पाईपलाईनचच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच आत्तार फय्याज( पप्पू भाई), मनोज बेल्लाळे, माजी उपसरपंच व मार्गदर्शक सुनील सोमवंशी, शिंदे दशरथ, मनियार फशी,पी. डी पाटील,संदीप अनंतवाळ, श्रीकांत जानते, फशीभाई मिर्झा, धिरज रेड्डी यांच्यासह क्रांती नगरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधतांना चंदन पाटील यांनी सांगितले की,उदगीरच्या विकासासाठी आता निधी कमी पडणार नाही.बनसोडे साहेब विकासाची गंगा खेचून आणतील असा विश्वास व्यक्त केला.
विविध वार्डात नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडवल्या जात असून नागरिकांमधून सर्व निडेबन ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.