अभाविप तर्फे मविआ सरकारचा निषेध करण्यात आला व श्रध्दांजली वाहण्यात आली

अभाविप तर्फे मविआ सरकारचा निषेध करण्यात आला व श्रध्दांजली वाहण्यात आली

लातूर (प्रतीनिधी) : पुणे येथील MPSC उत्तीर्ण असलेल्या स्वप्नील लोणकर याने अद्याप MPSC जागा भरती न करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे काल आत्महत्या केली. याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, लातूर शाखेतर्फे दयानंद गेट येथे म. वि. आ.सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला व त्याचबरोबर मौन पाळून स्वप्नील लोणकर याला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी जिल्हा संयोजक पवन बेळकोने यांनी, ‘MPSC घेण्याचा पूर्ण अधिकार हा आयोगाचा असतो. त्यानुसार ४२० जागांसाठी परीक्षा घेतली गेली. एकूण सर्व प्रक्रियेतून २०२० मध्ये त्यातील ४१३ विद्यार्थी पात्र देखील ठरले, पण त्यानंतरची जागा काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्या जागा अद्याप भरल्या गेल्या नाहीयेत, ज्यामुळे अशा विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत आहे. त्याच बरोबर शेतकरी- कष्टकरी यांची मुले लातूर, संभाजीनगर, पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची जातात आणि त्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलून सरकार या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहे!’ अशा शब्दात निषेध व्यक्त केला. ‘ग्रामपंचायत, जि.प. च्या निवडणूका वेळेवर होतात, अनेक कार्यालयांची उद्घाटने होतात, काही राजकीय पक्षांचे संवाद मेळावे देखील दिमाखात होतात पण MPSC च्या परीक्षा वेळेवर घ्यायला आणि त्याच्या जागा भरायला मात्र सरकारला सवड नाहीये’ अशा शब्दात जिल्हा आयाम प्रमुख प्रसाद मुदगले यांनी सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले. लातूर विभाग संघटन मंत्री सिद्धेश्वर तिडके यांनी, ‘लवकरात लवकर आरोग्य विभागातील भरती किंवा MPSC मार्फत होणाऱ्या भरती असतील त्या लवकरात लवकर कराव्यात अथवा अभाविप रस्त्यावर उतरेल!’ असा इशारा सरकारला दिला. यावेळी प्रणव सगर, निलेश लाडेकर, श्रद्धा मुरकुटे, अंकिता दीक्षित, सूरज रसाळ, आरोह कुलकर्णी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author