महाराष्ट्र बसव परिषद व शिवशक्ती युवक मंडळच्या वतीने कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र बसव परिषद व शिवशक्ती युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने व बसव परिषदचे जिल्हाअध्यक्ष श्री कुणालभैय्या बागबंदे यांच्या पुढाकारातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर व् वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सदरील कार्यक्रमाचे उदघाट्न काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री कल्याण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून न. प.सदस्य तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे हे होते तर विशेष उपस्थित म्हणून उदगीर चे कोरोनायोध्ये व सत्कारमूर्ती नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, डॉ दत्ता पवार, डॉ.शशिकांत देशपांडे, डॉ. गजानन भोसले लसीकरण प्रमुख डॉ.चंद्रकांत रामशट्टे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, डॉ. शेख मुद्दशिर उदगीर,आरोग्य कर्मचारी भांगे बबीता, भोसले, स्वामी, ई उपस्थित होते.ना. संजय बनसोडे यांनी संयोजक कुणाल बागबंदे यांना वृक्षारोपण आणि लसीकरण असा सुंदर योग आपण जुळून आनला.
सृष्टीची सुरुवात वृक्ष आणि सृष्टीचा बचावासाठी यावेळी आजची काळाची गरज लसीकरण हे धेय्य लक्षत घेऊन हा कार्यक्रम घेतला याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी अपंग व्यक्तीस दिव्यांग वाहनावर जागेवर प्रतिबंधक लस देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अनिल बागबंदे, संतोष चणगे, श्रीकांत पांढरे, मुन्ना होसाळे, हनुमंत चणगे, सागर सोलापुरे, गुंडप्पा बागबंदे, दिलीप माका,मनोज हावा, गणेश पांढरे, रजनीश कोटलवार , बंटी अमलकीरे, राजेश चिल्लरगे, गुंडप्पा बागबंदे, सुरज बागबंदे, ओम देवशेट्टी, सचिन आलंमकिरे, योगेश हिप्पळगे, राहुल बागबंदे , मनोज बिबराळे, अमित कंटे , कपिल बागबंदे, शैलेश बागबंदे ई प्रत्यन् केले कार्यक्रमाचे प्रस्तवना सूत्रसंचालन प्रा. श्री सिद्धेश्वर पटणे यांनी केले तर आभार ओमकार गांजुरे यांनि मानले!