शिरूर अनंतपाळ नगरपंचायत वर पाण्या साठी महाविकास आघाडीच्या वतीने घागर मोर्चा
शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : भर पावसाळ्यात शिरूर अनंतपाळ शहरात गेल्या 15 दिवसा पासून पाणी पुरवठा खंडीत झाला असून या मुळे शहरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे या विषयी अनेक वेळा नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागासी संपर्क केला असता प्रशासन या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे त्या मुळे महाविकास आघाडीच्या वतीने घागर मोर्चा काडून निषेध व्यक्त केला व पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण शहरात पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला नाही तर हालगी नाद मोर्चा काढण्यात येईल असे लेखी निवेदनाद्वारे मुख्यअधिकारी यांना निवेदन देण्यात आले या वेळी काँग्रेस चे शहरअध्यक्ष अशोक कोरे, शिवसेनेचे शहरप्रमुख सतिश शिवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संदिप धुमाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महादेव आवाळे, युवा नेते सुचित लासूने, ओबीसी शहराध्यक्ष नामदेव लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग आयतनबोने, समाजसेवक गोपाळ आण्णा हाद्राळे, आम आदमी पक्षाचे संयोजक आनंदा कामगुडा, युवा नेते अमर आवाळे, आनंत काळे, औदुंबर सिंदाळकर, बाबूराव तोरणे, संभाजीराव हत्तरगे,महादेव खरटमोल, गोविंद श्रीमंगल, विठ्ठल चाळकिकर, यश दुरूगकर, महादेव भोजणे, उदय बावगे, हनमंत जगताप, केदार लोंढे, सचिन गुगळे, प्रसाद शिवने, राष्ट्रवादी सोशल मीडिया चे तालुकाध्यक्ष शुभम आयतनबोने, मकबूल तांबोळी तसेच सौ सुलभा ताई आयतनबोने यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला या मोर्चात उपस्थित होते.