बोर्ड परीक्षेत एलिमेंटरी उत्तीर्ण असणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना यावर्षी वाढीव गुण मिळणार आकाशवाणी वरुन महादेव खळुरे यांचा सुसंवाद..
अहमदपूर (प्रतिनिधी) : सन 2021 मधिल SSC बोर्ड परीक्षेत एलिमेंटरी उत्तीर्ण असणाऱ्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना यावर्षी वाढीव गुण मिळणार आहेत .तसेच कलासंचालनालय मुंबई तर्फे चालत असलेल्या पायाभूत (फाऊंडेशन कोर्स)व एटीडी पदवीका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असते.पण सन 2021 मध्ये कोविड 19 या जागतिक महामारीच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा होऊ शकली नाही.म्हणून इंटरमिडिएट परीक्षा देण्यावाचून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत.यामुळेच महाराष्ट्र शासनाने सन 2021 मधिल दहावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फक्त यावर्षीसाठी इंटर मधुन सुट दिली आहे. तसेच एलिमिंटरी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी मार्क देण्याबद्दलचा शासन निर्णय दि. 16 जुन 2021 रोजी पारीत केला आहे.या विषयावर महादेव खळुरे यांच्या आकाशवाणी च्या परभणी केंद्रावरुन दि.6 जूलै मंगळवार सायं 6:30 वाजता बालमंडळ या कार्यक्रमातून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत.
यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना वाढिव गुणाचा फायदा होणार आहे.वरील शासन निर्णयामुळे सन 2020 मधिल प्रवेशित एटीडी व फाऊंडेशन कोर्सच्या विद्यार्थ्यांना ही इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण असने यात सुट देऊन सरळ प्रवेश देण्याचे ठरले आहे.
या शासन निर्णय मुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले नाही.कला विषयाचे वाढिव मिळणार नाहीत.असा शासन निर्णय निघाला होता.म्हणून अनेक विद्यार्थी या गुणापासून वंचित रहाणार होते.वेळीच कला शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने संबंध महाराष्ट्र राज्यातून या निर्णयाचा विरोध करुन शासनाला सुधारित शासन निर्णय काढण्यास भाग पाडले.व शासनाने ही मुलांच्या भविष्याचा विचार करुन हा निर्णय पारित केले आहे.
वरील यशाबद्दल संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी,मुख्याध्यापक वाघंबर गंपले ,उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे,पर्यवेक्षक उमाकांत नरडेले,दिलिप गुळवे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिनी आभिनंदन व कौतुक केले आहे.