शास्त्री शाळेत दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय उदगीर येथे गोपाळकाला निमित्त बालगोपालांच्या दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरद भवर, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. शरद भवर यांनी श्रीकृष्णाविषयी गोष्टीरुपात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.श्रीकृष्णाकडून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे, असे सांगितले. अध्यक्षीय समारोपपर भाषणात अंकुश मिरगुडे यांनी कृष्ण -सुदामाची गोष्ट सांगून आपणही मैत्रीमध्ये गरीब -श्रीमंत भेदभाव न करता कृष्णासारखी मैत्री करावी.असे आवाहन केले. शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राधा व कृष्णाच्या वेशभूषा केलेल्या होत्या.मुलींनी टिपरी नृत्य सादर केले तर,बालगोपालांनी मनोरे रचून दहिहंडी फोडली.सर्वांना बालगोपाळांनी तयार केलेला काला प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. सुत्रसंचलन तुकाराम पेद्दावाड यांनी केले.सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.