पक्षश्रेष्ठी निश्चितच पक्षाचे हित पाहतील – विश्वजीत गायकवाड

0
पक्षश्रेष्ठी निश्चितच पक्षाचे हित पाहतील - विश्वजीत गायकवाड

पक्षश्रेष्ठी निश्चितच पक्षाचे हित पाहतील - विश्वजीत गायकवाड

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाने या ठिकाणावरून उमेदवारी न देणे म्हणजे एका अर्थाने पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीतील इतर घटक पक्ष आजच स्पष्टपणे बोलत आहेत, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार आहे. मग आज जर इतर घटक पक्षाला भारतीय जनता पक्षाने ताकद दिली तर आगामी निवडणुकांमध्ये तीच ताकद भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये वापरली जाऊ शकेल, आणि जो कधीकाळी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्याला कोणत्याही निवडणुकांमध्ये संधी मिळणार नाही. हा धोका संभवतो. मग नगरपरिषद असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल या सर्व निवडणुकांमध्ये ज्या पक्षाचा उमेदवार जिंकेल त्याचेच कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी निवडून येतील, आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची होणारी हानी आणि पक्ष संघटन बांधणीला बसला जाणारा तडा निश्चितपणे पक्षश्रेष्ठी विचारात घेतील. अशी आशा भाजपाचे युवा नेते इंजि. विश्वजीत गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पक्षाकडे होते. पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होती. मात्र याच मित्र पक्षांनी पक्षातील सदस्यांची फोडाफोडी करून पंचायत समिती ताब्यात घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून तसेच पूर्वी नगरपरिषद भारतीय जनता पक्षाने मोठ्या ताकतीने आपल्या ताब्यात ठेवली होती. त्या ठिकाणी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरपरिषद सदस्य नव्हता. मात्र येणाऱ्या काळात आज जर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली पूर्ण शक्ती मित्र पक्षाच्या पाठीशी लावली तर तोच मित्र पक्ष उद्या प्रतिस्पर्धी ठरणार असल्याने तळागाळातील कार्यकर्त्याचे राजकारण संपुष्टात येऊ शकते. ही शक्यता पक्षश्रेष्ठी निश्चित विचारात घेतील आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष वरचढ आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार विधानसभेसाठी देतील. यासंदर्भात आपल्याला पूर्ण विश्वास आहे. असेही मत इंजी. विश्वजीत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
सध्या उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून तर काँग्रेस पक्षाच्या वतीने सौ. उषा कांबळे, काँग्रेसच्या मित्र पक्षाच्यावतीने निवृत्तीराव सांगवे, मधुकर एकुर्केकर, या तिघांपैकी एक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून नव्याने पक्ष संघटनेत सामील झालेले माजी आ. सुधाकर भालेराव, 2019 साली भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढलेले आणि विद्यमान स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी जवळीकता साधणारे डॉ. अनिल कांबळे, इतकेच नव्हे तर नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेले ऍड.करडखेलकर हे देखील दावेदार आहेत.
भारतीय जनता पक्षाकडे आपण उमेदवारी मागितलेली आहे. आणि आपण भारतीय जनता पक्षासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन पक्ष आपल्या मागणीचा निश्चित विचार करेल. या विश्वासाने आपण मतदार संघामध्ये पक्ष संघटन वाढीसाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही याप्रसंगी विश्वजीत गायकवाड यांनी सांगितले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed