उदयगिरी महाविद्यालय क्रॉस कंट्री स्पर्धेत महिला गटाला उपविजेतेपद
उदगीर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथे आंतर महाविद्यालय क्रॉस कंट्री (पुरुष व महिला) स्पर्धा दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा संघाने विद्यापीठात सर्व द्वितीय क्रमांक (उपविजेतेपद) पटकाविला आहे. विजेत्या संघामध्ये आरती जाधव, शारदा बेलुरे, वैशाली राठोड, स्नेहलता पवार, सुप्रिया पवार या खेळाडूंचा समावेश होता. तसेच या महाविद्यालयाचा खेळाडू पिराजी गित्ते यांनी ब विभागाचे प्रतिनिधित्व करून ब विभाग क्रॉस कंट्री (पुरुष) संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याबद्दल विजेत्या खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी. पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.