शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी उदगीरमध्ये निषेध मोर्चा

0
शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी उदगीरमध्ये निषेध मोर्चा

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी उदगीरमध्ये निषेध मोर्चा

उदगीर (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर राज्यभरातील शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. उदगीरात निषेध आंदोलन करण्यात आले. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण सोहळा पार पडला होता. मात्र अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी मंळवारी उदगीरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाराजांचा पुतळा पडल्याने त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यात दोषी असणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष कृष्णा घोगरे, शहराध्यक्ष अजय शेटकार, युवा नेते रामकुमार आदावळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष धर्मराज पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुशांत बनसोडे, विद्यार्थी शहराध्यक्ष अभिजीत अंधारे, कार्याध्यक्ष अमित सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष सुमित पाटील, मुकुंद मुंडे, नवनाथ पवार, विकी सोनकांबळे, गुरुप्रसाद बिराजदार तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed