राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जनतेची सेवा करणारा जनसेवक – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वमंत्री पदाधिकारी कार्यकर्ते हे केवळ आणि केवळ जनतेची सेवा करणारे जनसेवकच आहेत. म्हणूनच तर जनतेचा सन्मान करण्यासाठी जनसन्मान यात्रा काढून केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडत आहोत असे प्रदिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी येथील जिजाऊ फंक्शन हॉलमध्ये जनसन्मान यात्रेत बोलताना केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री पदाधिकारी कार्यकर्ते हे फक्त जनतेची सेवा करणारे जनसेवकच आहेत. त्यासाठीच जनतेचा सन्मान करण्यासाठी जनसन्मान यात्रा काढून केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडावा हा हेतू या जनसमान यात्रेचा आहे. असे मत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे अध्यक्षस्थानी तर मंचावर क्रीडामंत्री संजय बनसोडे राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आ. विक्रम काळे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव आ. बाबासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष अफसर शेख, सुरज चव्हाण, व्यंकटराव बेद्रे, शिवानंद हेंगणे ,मीनाक्षी शिंगडे, अश्विनी कासनाळे, अनुराधा नळेगावकर, शाहू कांबळे, अझहर बागवान यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. युग पुरुष छ्त्रपति शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना अठरा पगड जातींना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तो इतिहास आपल्या सगळ्यां समोर आहे.शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चालेलो आहे. आमचे सेक्यूलर विचाराचे पक्ष आहे. सरकारमध्ये काम करत असताना कोणावरही अन्याय होऊ नये. कोणालाही नाहक त्रास होऊ नये. कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये आसे आमचे सरकार काम करत आहे.सध्या राज्याचे सरकार हे सर्वसामान्य सरकार असून आम्ही काढत असलेल्या जनसन्मान यात्रेस महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना अमलात येऊ नये म्हणून विरोधकांनी कोर्टातून बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु, तो प्रयत्न हाणून पाडल्यानंतर सदर योजना फक्त भावी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणल्याचे बोलले गेले परंतु, ही योजना कायमस्वरूपी असून भविष्यात बंद होणार नाही. अशी ग्वाही यावेळी अजित पवार यांनी दिली शहरी व ग्रामीण भागात अनेक महिला मोल मजुरी करून स्वतःच्या जीवाची परवा न करता सतत १८ ते २० तास काम करतात. आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देतात परंतु, हे करत असताना त्यांचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. हे लक्षात घेऊन आम्ही महिलांना आर्थिक सक्षम करावे या हेतूने तसेच महिलांचा स्वाभिमान जागृत व्हावा आरोग्याकडे लक्ष देता यावे. म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अमलात आणल्याचे सांगितले.
आ. बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर चाकूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुमारे दोन हजार पाचशे कोटी रुपये निधी आणुन विविध विकासाची कामे केली आहे. त्यांना तुम्ही आमदार केला तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. म्हणून अडीच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून मतदारसंघात सर्वत्र विकासाची कामे केले लाडक्या भावासाठी १५ हजार कोटीचे वीज बिल माफ केल्याचे सांगून यापूर्वीचे वीज बिल भरू नका मी बघून घेतो अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. केंद्राच्या विचाराचा राज्यात सरकार असेल तर राज्याचा विकास होतो राज्याला अधिकचा निधी मिळतो लोकसभा काळामध्ये विरोधकांनी संविधान बदलणार अशा प्रकारचे काही खोटे प्रचार केले परंतु, संविधान कधीही बदलणार नाही .खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका बदलापूर तसेच राज्यात महिला व अत्याचार झाले आहेत.हा अक्षम्य गुन्हा असून आरोपींना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा करणार असून राज्यातील महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. व कायदे आणखीन कडक करून अत्याचार करणाऱ्यास कोठोराताली कठोर शिक्षा करण्यात येईल.महिला अत्याचाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो यासाठी राज्य सरकार आणखीन कडक कायदे करणार असून अत्याचार करणाऱ्यास कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल.
महिलांच्या सन्मानाने सुरक्षा बाबतीत सरकार गंभीर आहे सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नुकताच वाऱ्यांने पुतळा पडला असला तरी या प्रकरणात जो कोणी दोषी आहे. कोणताही अधिकारी असला तर त्याला माफ केले जाणार नसून याबाबतीत मी तमाम जनतेची माफी मागतो कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. बाबासाहेब पाटील यांनी केले. सुत्रसंचलन पुरुषोत्मम माने यांनी केले
तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद यांनी केले.
…………..
आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य असुन अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदारसंघात अडीच हजार कोटींचे कामे केल्याचे सांगून लाडकी बहिण योजनेअंतर्गत या मतदारसंघातील ८७ हजार बहिणीना लाभ मिळाला असुन आमचे उदिष्ट संपूर्ण लाडक्या बहिणांना लाभ देण्याचे आहे. मतदारसंघाच्या विकासाठी आपण कटिबध्द असुन, सिंचनाचे कामे, रस्ते, पाणी, उपसा जलसिंचन योजना यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यांने कार्य केलेले आहे. यापुढेही करत राहणार आसे आ. पाटील म्हणाले.
…………
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण जिजाऊ फंक्शन हॉलमध्ये सुरू असताना.सकल मराठा समाज बांधवांनी जिजाऊ फंक्शन हॉलच्या प्रवेशद्वारावर आरक्षणा संदर्भात
उपस्थित सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून सोबत घेऊन गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रम संपूवून जातानाही बाहेर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे या घोषणा दिल्या.