भारतीय जनता पक्षाच्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
भारतीय जनता पक्षाच्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पक्षाच्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सरकारनी गेल्या अडीच वर्षात जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून समाजातील सर्व घटकांना न्याय दिला असल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनजागरण करण्यात आले.
आज दि. 27 आगस्ट रोजी सकाळी 7 वाजता अहमदपूर शहरातील शीप्र गणेश मंदीरात पुजा व दर्शन करून जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली.
तदनंतर अहमदपूर तालुक्यातील काळेगाव, शेनकुड, सुमठाना,बेंबडेवाडी,वंजारवाडी,धसवाडी, खंडाळी, नागझरी,उजणा, उत्तर रुई, सांगवी,रुद्धा,हागदळ,गुगदळ, हागदळ, वरवटी,दक्षीन रुई, शिंदगी खु. अशा खंडाळी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात ही जनसंवाद यात्रा गेली असता जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या जनसंवाद यात्रेला मिळाला.
भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते व पदाधिकारी यांनी जनतेच्या गाठीभेटी घेऊन जनतेची संवाद साधला.जनसंवाद यात्रेचे व उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे गावोगावी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सदरील जनसंवाद यात्रेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी आमदार बब्रुवान खंदाडे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत चामे ,ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानोबा बडगिरे, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, जिल्हा चिटणीस हणमंत देवकते,प्रदेश सदस्य हेमंत गुट्टे,दत्ता जमालपुरे,तालुका सरचिटणीस माणिक नरवटे, महीला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे, तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पाटील, प्रफुल ढवळे,सरपंच संग्राम नरवटे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जनसंवाद यात्रेत सहभागी झाले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed