हैद्राबाद इंटरनॅशनल मॅरेथॉन 2024 मध्ये अहमदपूर रनर्स ग्रुपचा डंका
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर हे शिक्षण पंढरी या शहराची ओळख अख्या महाराष्ट्रात आहे.. तोच वारसा स्पोर्ट मध्ये सुद्धा अहमदपूर रनर्स ग्रुप ने कायम ठेवत….25 ऑगस्ट 2024 रोजी भारतातील दुसऱ्या क्रंमाकांची एन.एम.डि .सी. सी हैद्राबाद इन्टनॅशनल मॅरेथॉन नुकतीच पार पडली त्यात अहमदपूर रनर्स ग्रुप च्या सदस्यांनी आपली उत्तम कामगीरी करत अहमदपूर शहराचा स्थान व दबदबा निर्माण करत बाजी मारली…..
फुल मॅरेथॉन
42.200km मध्ये तिघांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये
42.200km मध्ये 1. श्री धंनजय तोकले सर यांनी 42.200km हे अंतर 04:32:30 पूर्ण 2.श्री बरुरे नामदेव यांनी 42.200km हे अंतर 04:36:46 से. पूर्ण केले. व तसेच पोलीस उपनिरीक्षक राम केंद्रे यांनी 42km हे अंतर 04:33:20 सें. पूर्ण केले
हॉफमॅरेथॉन 21km
या कॅटेगीरीत श्री सुडे हानमंत 21km.2 :04 मि., देशमुख संतोष 02 :11 मि., भरत ईगे 02:16 मि., अलापूरे सुकेश 01:58., गोकुळे सर 02:15 महादेव – 02:40 मि., अजब सिंग 02:21 मि., श्री बालाजी गेंदेवाड 02: 33 मि.
10km मॅरेथॉन
श्री पाटील संतोष सर किलबील प्राचार्य 01:06 मि, श्री अशीष हेंगणे 01:06 मि, डॉ स्वामी मन्मथ 01:10 मि, ॲड. अभिजीत कराड 1:13 मि, सीए.श्री राहूल हिप्परगेकर 01:31, श्री बोराळकर सर 01:39 , के. डी. बिरादार सर 01:25, श्री सचिन करकनाळे 01:30, आंबादास कोरनुळे 01:34,
डॉ. मुलतान सय्यद 01:36 वरील सर्व 20 ते 55 गटातील सदस्यांनी आपल्या ह्याही वया मध्ये धावून मॅरेथॉन विश्वात एक अहमदपूर शहराची ओळख निर्माण केली. हा अहमदपूर रनर्स ग्रुप हा निरोगी आरोग्य जपण्यासाठी व आपण कुजून मरण्यापेक्षा झिजून मरणे केंव्हाही उत्तम आहे. आरोग्य ही सर्वोत्तम संपत्ती . अशा अनमोल संपत्तीचे जतन करण्यासाठी नियमित पणे व्यायामाची आवश्यकता आहे.. त्यानुसार हा अहमदपूर रनर्स ग्रुप हा अहमदपूर शहरात निरोगी आरोग्या साठी सायकल चालवणे, रनिंग करणे, चालणे , योगा या विषयीची निरोगी आरोग्य कसे ठेवता येईल या साठी समाजात जागरुकता आणून समाज निरोगी रहावा या साठी श्री बरुरे सर, तोकले सर, भरत ईगे, अशीष हेंगणे, वेदान्त राठोड, पवन पूरोहीत हे नेहमीच अग्रहशील प्रयत्नशील असतात.