विधान सभेचे इच्छुक उमेदवार स्वप्निल जाधव “आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराने” सन्मानित

0
विधान सभेचे इच्छुक उमेदवार स्वप्निल जाधव "आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराने" सन्मानित

विधान सभेचे इच्छुक उमेदवार स्वप्निल जाधव "आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराने" सन्मानित

उदगीर (श्रीधर सावळे) : उदगीर विधानसभा मतदार संघासाठी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर केलेले, लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले स्वप्निल जाधव यांना आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने समाजसेवेला वाहून घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला हा पुरस्कार मिळाल्याची प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे. डायमंड मित्र मंडळ आणि शिव-भीम तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या पुरस्कारासाठी स्वप्निल जाधव यांच्या समाजकार्याचा प्राधान्याने विचार करण्यात आल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण समितीचे प्रेरणास्थान म्हणून नारायण दादा गायकवाड हे आहेत. तर संस्थापक अनिल भाऊ गायकवाड आणि अध्यक्ष म्हणून चेतन भाऊ विटकर हे काम पाहत आहेत. अत्यंत खडतर जीवनाचा प्रवास करत असताना देखील समाजसेवेचा वसा आपल्या जीवनाच्या प्रवासात प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षपणे, तत्परतेने, स्वयंशिस्त आणि सर्वांना सहकार्य करण्याची भावना तसेच जपलेला व्यापक जनसंपर्क व आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याची वृत्ती याची विशेष करून दखल घेऊन डायमंड मित्र मंडळ व शिव भिम तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपणास हा आदर्श पुरस्कार देण्यात येत असल्याचे सन्मानपत्राद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
अल्पावधीतच उदगीर विधानसभा मतदारसंघात झंजावाती दौरा करून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या स्वप्नील जाधव यांना समाजातील विविध पक्ष संघटना आणि सामाजिक संघटनांनी पाठबळ द्यायला सुरुवात केलेली आहे. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अशा पद्धतीचे सामाजिक पुरस्कारही त्यांना दिले जात आहेत. त्याबद्दल त्यांच्या मित्रमंडळी कडून त्यांचा यथोचित गौरव केला जात आहे. तसेच सन्मानही करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वप्नील (अण्णा) जाधव मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed