मुलिंची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवू : भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्यासह सकल हिंदू समाजाचा पत्रकार परिषदेत इशारा
लातूर (प्रतिनिधी) : भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा भाजी विक्रेत्याने विनयभंग केल्याची घटना लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये घडली होती. आरोपीस गांधी चौक पोलिसांनी अटकही केली आहे. यावरून सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून गुन्हेगारास कठोर शिक्षा करावी अशी मागणी करून भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने आज 29 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदे घेऊन तीव्र निषेध करण्यात आला. शिवाय मुलींची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना चांगलाच धडा शिकवू असा इशारा आजच्या पत्रकार परिषदेत भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे व सकल हिंदू समाजाने दिला आहे.
एका हिंदू मुलीची मुस्लिम मुलाने छेड काढल्याच्या या संतापजन्य घटनेमुळे लातूरच्या बाजारात तणावपूर्ण शांतता दिसून येत होती. गुरुवार सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान शहरातील प्रमुख असलेल्ल्या महात्मा फुले भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका तरुणीचा येथील भाजी विक्रेता आझम काझी या तरुणाने वाईट हेतूने स्पर्श करून विनयभंग केला, यावर तरुणी शांत न राहता आरोपीच्या कानशिलात लगावली, यावेळी सदर तरुणी आणि विक्रेत्यात झालेल्या वादामुळे मार्केट मध्ये बराच वेळ गोंधळ झाला, यानंतर तरुणीचे नातेवाईक आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी यांनी जाब विचारत पोलिसात तक्रार दिली, यावरून गांधी चौक पोलीस ठाण्यात सदर छेड काढणाऱ्या आजम काझी या भाजी विक्रेत्या तरुनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे. लातूरच्या भाजी मंडई व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिलांवर होत.
असलेल्या अत्याचाराच्या प्रकारामुळे देशातील वातावरण आधीच गढूळ झाले आहे. यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून वेळीच अशा प्रवृत्तीना आळा घालावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, विर योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजनकर, माजी नगरसेवक रवी सुडे,मनोज डोंगरे यांनी सदर प्रकाराविषयी माहिती देत असे प्रकार होत असतील तर आमच्या भगिनींनी शांत राहू नये असे आवाहन करत या तरुणीने केलेल्या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले. जशास तसे उत्तर देणार. लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी गेलेल्या तरुणीचा भाजी विक्रेत्याने विनयभंग केला हा प्रकार अतिशय निंदनीय असून यावर पोलीसांनी कठोर कारवाई करावी, यासाठी आम्ही
पाठपुरावा करणार आहोतच, परंतु असे प्रकार केवळ महात्मा फुले भाजी मंडईतच होतात असे नाही तर इतर भाजी मार्केट, गंजगोलाई आणि अन्य ठिकाणीही महिला, तरुणीना छेडण्याचे प्रकार होत आहेत, भाजी, फळ विक्रेते डबल मिनिंग बोलून महिलांना त्रास देण्याचा जिहादी प्रकार लातुरात होत आहे. यापुढे ही बाब निदर्शनास आल्यास त्याला त्याच ठिकाणी जशास तसे उत्तर देऊ असा इशारा वीर यौद्धा संघटनेचे श्रीकांत रांजनकर आणि माजी नगर सेवक रवी सुडे यांनी दिला आहे.आज गुरुवारी सकाळी घडलेल्या निंदनीय प्रकाराचा निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनानी उद्या 30 ऑगस्ट रोजी लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. याबाबत बाजार समितीचे सभापती, सचिव यांना भेटून आरोपी आजम काझी याचा भाजी विक्रेता परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.